ETV Bharat / city

st workers strike : राज्यातील प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे - मंत्री वडेट्टीवार

भाजप सरकार असतानाही याच मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (st workers strike) पुकारला होता. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करणारे आज एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात सामावून घेण्याची मागणी करत आहेत, असा आरोपही यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे

मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Nov 11, 2021, 7:42 PM IST

नागपूर - राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (st workers strike) सुरू असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील विरोधी पक्षानी पाठिंबा जाहीर केला असून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) रस्त्यावर उतरले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. पण, यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष एसटी कर्मचाऱ्यांना चिथावून राज्यातील प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार

एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे करुन स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचे कारस्थान

भाजप सरकार असतानाही याच मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करणारे आज एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात सामावून घेण्याची मागणी करत आहेत, असा आरोपही यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे तत्कालिन अर्थमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये सामावून घेता येत नाही, असे सांगणारे स्पष्ट व्हिडिओ आहे. आता मात्र सामावून घेण्यासाठी चिथावणी देण्याचे काम भाजप करत आहे. यातून घुमजाव करण्याची भाजप नेत्यांची संस्कृती जनतेसमोर येत आहे. कोरोना अडचणीत असताना ही मागणी करणे म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठीचे हे कारस्थान असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

कोरोनानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेले वेतन नक्कीच कमी आहे. पण, तरीही न्यायालयाच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आवाहन केले. एसटी कर्मचाऱ्यांचे वेत नक्कीच वाढवण्याची गरज आहे. पण, एसटी कर्मचारी हे राज्य सरकारमध्ये सेवेत सामावून घेण्यासाठी अडून बसले आहेत. हा विषय सध्या न्यायालयात सुरू असला तरी हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावे, अशी विनंती आहे. यावर सन्मानजनक तोडगा काढण्याचेही सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

त्या नक्षली पत्राबद्दल गृह विभाग चौकशी करत आहे

नक्षलवाद्यांनी जे आरोप केले त्याची चौकशी गृहखात्याकडून केली जात आहे. सुरजगडच्या लोह खाणीला पाठिंबा देत असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. मात्र, त्या खाणीशी माझा काहीही संबंध नसून एटापल्लीमध्ये सुरज गडाबद्दल झालेल्या आंदोलनात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने मला तिथे जाऊ नये, अशी विनंती केली असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. मात्र, या सगळ्या प्रकरणाला घेऊन मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. माझा लोह खाणी किंवा त्यांच्या मालकाशी कुठलाही संबंध नसून त्यांना समर्थन करण्याचा प्रश्नच उरत नाही. माझा उद्देश गडचिरोलीच्या मागास भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा इतकाच आहे, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा - कोण आहेत नवाब मलिक..?, जाणून घ्या त्यांचा व्यवसायिक ते राजकारणापर्यंतचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.