ETV Bharat / city

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन : नसरीनची 'नई दिशा' किशोरवयीन मुलींसाठी वरदान - जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन

आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन जाहीर केला आहे. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे स्त्रियांना मातृत्वाच्या सुखाचा अनुभव घेता येतो. पाळीबाबत आजही आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत.

Nasreen Shamim Ansari
तरुणीचा मासिक पाळी विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद
author img

By

Published : May 28, 2022, 4:31 PM IST

Updated : May 28, 2022, 5:28 PM IST

नागपूर - आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन जाहीर केला आहे. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे स्त्रियांना मातृत्वाच्या सुखाचा अनुभव घेता येतो. पाळीबाबत आजही आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागपूरच्या एका मुस्लिम समाजातील तरुणीने मासिक पाळी या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहे. 'नई दिशा' या प्रकल्पाअंतर्गत नसरीन शमीम अन्सारी या गेल्या 2 वर्षापासून महानगर पालिकेच्या २८ शाळेत जाऊन किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करत आहेत. त्यामुळे आज तब्बल 3 हजार किशोरवयीन विद्यार्थीनी मासिक पाळी दरम्यान त्यांचा अधिकार काय आहेत याची जाणीव करून दिली आहे.

नागपुरातील तरुणीचा मासिक पाळी विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद

शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुली आजही या विषयवार मुक्तपणे आपले विचार मांडू शकत नाहीत. मासिक पाळी दरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी किशोरवयीन मुलींची अनेकदा कुचंबना देखील होते. मासिक पाळी दरम्यान पाच दिवस मुलींच्या शिक्षणात खंडसुद्धा पडतो. मुलींना आणि महिलांना प्रत्येक महिन्यात भेडसावणारी ही समस्या सोडवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे लक्षात येताच नागपुरातील ताजबाग येथे राहणाऱ्या नसरीन शमीम अन्सारी या तरुणीने मासिक पाळीत किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली. नसरीन गेल्या दोन वर्षांपासून हे काम करत आहेत.

नसरीन शमीम अन्सारी या तरुणीने नई दिशा हा उपक्रम राबवून नागपुर महापालिकेतील 28 शाळेतील तब्बल 3 हजार किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबतचे शिक्षण आणि उपाय, या काळात घ्यावयाची काळजी, मुलींचे हक्क यासंदर्भात जनजागृती केरत आहेत.

हेही वाचा - विज्ञान युगातही मासिक पाळी ठरतेय विटाळ, क्षितिज स्वयंसेवी संस्था करतेय जनजागृती

28 शाळेच्या 28 विद्यार्थींनिंची टीम लीडर - नसरीन यांनी नागपूर महानगर पालिकेच्या 28 शाळेतील 28 विद्यार्थींनिंची टीम लीडर म्हणून निवड केली. त्यांचा मदतीकरिता शाळेतीलच एक शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी यांची समिती शाळेतच तयार करण्यात आली. हे यशस्वी नियोजन नसरीन अन्सारी हिने नागपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेच्या तांत्रिक मदतीने केले आहे.

3 हजार किशोरवयीन विद्यार्थिनींचे समुपदेशन - नागपूर महापालिकेनेही किशोरवयीन मुलींचा समस्येला गांभीर्याने घेऊन नसरीन यांना संपूर्ण सहकार्य करत आहे. महापालिकेचे सहकार्य आणि नसरीन यांच्या परिश्रमामुळेचं आज 28 शाळांमध्ये 3 हजार किशोरवयीन विद्यार्थिनींची मासिक पाळी या विषयावर सखोल समुपदेशन केले आहे, त्यामुळे आज या विद्यार्थिनी आत्मविश्वासपूर्वक मासिक पाळीवर चर्चा करू शकतात.

सॅनिटरी पॅड करून दिले उपलब्ध - किशोरवयीन विद्यार्थिनींना नागपूर महापालिके तर्फे चांगल्या दर्जाचे मोफत सॅनिटरी पॅड दिले जात आहे. नसरीन यांच्या संकल्पनेतुनचं शाळेतील शिक्षिका, विद्यार्थ्यांनिंची प्रतिनिधी किशोरवयीन विद्यार्थिनींना महिन्याचा पहिल्या आठवड्यात मोफत पॅड वितरित करतात.

पॅडची विल्हेवाट लावण्याचे दिले प्रशिक्षण - नसरीन यांच्या उपक्रमानंतर मनपाच्या प्रत्येक शाळेत उपयोगात आलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता दोन अत्याधुनिक डीस्पोजल युनिट लावण्यात आल्या आहेत,त्यामुळे निरोगी व्यवस्था निर्माण झाली आहे. विद्यार्थिनींन करिता स्वच्छ प्रशाधनगृह निर्माण करण्यात आले असून याठिकाणी भरपूर पाणी आणि वर्तमानपत्रे ठेवण्यात आली आहेत. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी बाबत नसरीन शमीम अन्सारी या तरुणीने सुरू असलेला नयी दिशा उपक्रम किशोरवयीन मुलींसाठी वरदान ठरले आहे.

हेही वाचा - Menstrual Hygiene Day : मासिक पाळी स्वच्छता दिनी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन

Last Updated : May 28, 2022, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.