ETV Bharat / city

२७ वर्षांचा लढा, ११४ बांधव हुतात्मे; गोवारी समाज अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत - शहीद गोवारी स्मृती दिवस

23 नोव्हेंबर 1994चा तो दिवस होता. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) होते. त्यादिवशी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हजारो गोवारी समाजातील बांधव (gowari community) आपल्या मागण्यांसाठी विधीमंडळावर मोर्चा घेऊन आले होते. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये उडालेल्या संघर्षात गोवारी समाजातील ११४ गोवारी बांधवांचे हुतात्मे झाले होते. त्या दुर्दैवी घटनेचा आज २७वा स्मृती दिवस आहे.

शहीद गोवारी स्मृती दिवस
शहीद गोवारी स्मृती दिवस
author img

By

Published : Nov 23, 2021, 3:06 PM IST

नागपूर - आज शहीद गोवारी स्मृती दिवस(Gowari Memorial Day). आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूर येथील विधीमंडळावर काढलेल्या मोर्चात राज्यातील हजारो गोवारी बांधव (gowari community) सहभागी झाले होते. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये उडालेल्या संघर्षात गोवारी समाजातील ११४ गोवारी बांधवांचे हुतात्मे झाले होते. त्या दुर्दैवी घटनेचा आज २७वा स्मृती दिवस आहे. २७ वर्षानंतरदेखील गोवारी समाजाच्या मागण्या जशाच्या तशा असल्याने गोवारी समाजात आपल्या व्यवस्थेविरुद्ध चीड आणि राज्यकर्त्यांबद्दल असंतोष असल्याचे प्रकर्षाने जाणवते. समाजासाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या ११४ शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव नागपूरच्या शहीद गोवारी स्मारक येथे येतात. मात्र एसटी बसेसचा संप असल्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या जवळील गोवारी बांधवच पोहोचू शकले आहेत.

शहीद गोवारी स्मृती दिवस
शहीद गोवारी स्मृती दिवस

27 वर्ष पूर्ण

23 नोव्हेंबर 1994चा तो दिवस होता. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यादिवशी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हजारो गोवारी समाजातील बांधव आपल्या मागण्यांसाठी विधीमंडळावर मोर्चा घेऊन आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि आदिवासी विभागाचे मंत्री मधुकर पिचड यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेण्यासाठी यावे या मागणीवर मोर्चेकरी अडून बसल्याने तणाव वाढत होता. त्याचवेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे मोर्चेकरी सैरभैर होऊन पळत असताना एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली, ज्यामुळे गोंधळ आणखीच वाढला. चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज त्या घटनेला २७ वर्ष पूर्ण झाले असले तरी दुःख मात्र किंचितही कमी झालेले नाही.

शहीद गोवारी स्मृती दिवस

'राजकारण्यांनी आमचा वापर केला'

गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी गोवारी समाजाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकारणाकरिता केला असल्याचा आरोप गोवारी समाजातील मंडळींनी केला आहे. केवळ आपले राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सर्वच राजकारण्यांनी आश्वासनांच्या खैराती वाटल्या असल्याचे ते म्हणाले आहेत.

'एसटीच्या संपाचा फटका'

शहीद गोवारी स्मृती दिवसानिमित्ताने राज्यभरातून हजारो गोवारी बांधव नागपुराला येत असतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहीद स्मारकाच्या ठिकाणी बांधव येऊ शकते नव्हते. यावर्षी गर्दी वाढण्याची शक्यता होती. मात्र गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने यावर्षीदेखील गोवारी बांधव स्मारकाच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.