नागपूर - कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करून आरोपीने स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतांमध्ये आरोपीची पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीचा समावेश असून विजया माटूरकर (पत्नी), बिंटी माटूरकर ( मुलगी), साहिल माटूरकर (मुलगा), लक्ष्मी बोबडे (सासू), अमिषा बोबडे (मेहुणी), असी मृतकांची नावे आहेत. तर आलोक माटूरकर असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात घडली.
हेही वाचा - अनिल देशमुखांसदर्भातील राज्य सरकारची ती याचिका फेटाळून लावा; अॅड पाटील यांची मागणी
शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस -
ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. नेहमी सकाळी लवकर उठणारे माटूरकर कुटुंब दुपार झाली तरी उठले नाही. माटूरकर यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही, त्यामुळे शेजारच्यांनी खिडकीतून आवाज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माटूरकर यांचा मुलगा साहील हा समोरच्या खोलीत असलेल्या बेडवर निपचित पडलेला दिसून आला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने काही तरी अप्रिय घटना घडली असावी, असा संशय आल्याने शेजारच्या लोकांनी या संदर्भात सूचना तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनीदेखील घटनास्थळी गाठून घराच्या आत प्रवेश केला. तेव्हा समोरच्या खोलीत साहील मृतावस्थेत आढळून आला. तर आतमधल्या खोलीत विजया आणि परी रक्ताच्या थारोळ्यात पडलले होते. तसेच आलोक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती संपूर्ण टिमकी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलीस अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यातच काही अंतरावर असलेल्या आलोकच्या सासरीदेखील दोन मृतदेह पडून असल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी विजया यांची आई लक्ष्मी बोबडे आणि साळी आमिषा बोबडे दोघींचे मृतदेह आढळून आले. आलोकने सुरवातीला स्वतःच्या कुटुंबाला संपवल्यानंतर सासरी जाऊन सासू आणि साळीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आरोपी आलोक आणि त्याची साळी आमिषा यांच्यात वाद झाला होता. या संदर्भात साळीने तहसील पोलीस ठाण्यात ३५४ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्याच घटनेचा राग मनात धरून आरोपीने हे भयानक कृत्य केले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा - 'मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की',अमेय खोपकर यांनी केलं ट्विट