नागपूर - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Sidhu Musewala Murder Case ) तीन-चार राज्यांचे पोलीस एकत्रित कारवाई करत आहेत. मात्र, तपासासंदर्भात सद्या बोलू शकत नाही. कारण ते संवेदनशील प्रकरण आहे. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे एटीएस त्यावर ( Maharashtra ATS ) लक्ष ठेवून असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी दिली आहे. ते नागपूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
निदर्शने शांततेत - राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लीम समाजाकडून भाजपचा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. मात्र, ती शांततेच्या वातावरणात झाली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. ज्या ज्या ठिकाणी निदर्शन करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले. त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले.
आजच्या बैठकीत घेणार आढावा - नागपूर तुरुंगात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा नवीन तुरूंग निर्माण करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, जेलमध्ये कैद्यांच्या मृत्यूच्या घटना का घडत आहे. यासंदर्भात आढावा घेणार असल्याचेही ते वळसे पाटील म्हणाले. देशभरात तसेच नागपुरातील संघ कार्यालयात असलेला दहशतवादी धोका आणि त्या संदर्भात नुकत्याच आलेल्या अलर्टच्या अनुषंगाने आम्ही नक्कीच आढावा आजच्या बैठकीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.