ETV Bharat / city

#coronavirus : अमेरिकेतील 'त्या' घटनेनंतर महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष

कोरोना विषाणूची लागण फक्त मनुष्याला होत होती. मात्र, न्यूयॉर्क शहरातील ब्रॉनेक्स प्राणी संग्रहालयातील चार वर्षीय वाघाला कोरोनाची लागण झाल्याने या विषाणूचा संसर्ग प्राण्यांना देखील होत असल्याचे समोर आले आहे.

महाराजबाग प्राणी संग्रहालय नागपूर
महाराजबाग प्राणी संग्रहालय नागपूर
author img

By

Published : Apr 10, 2020, 11:23 AM IST

नागपूर - अमेरिकेच्या न्यूयार्क येथील एका वाघाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आता देशभरातील प्राणिसंग्राहलयातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. या अनुषंगाने 'द नेशनल टाइगर कंर्जवेशन अथॉरिटी' आणि 'झू ऑथॉरिटी'कडून सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरात गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्र आणि महाराज बाग प्राणी संग्रहालयात वाघांसह हरीण, बिबट, सांबर इतरही प्राण्यांचे वास्तव्य आहे.

महाराजबाग प्राणी संग्रहालय नागपूरचे प्रभारी डॉ. सुनील बाविस्कर यांची माहिती....

हेही वाचा... अमेरिकेत वाघाला कोरोना झाल्याची माहिती पुढे येताच 'ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र' सॅनिटाईज

वन्य प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने एपिडेमिक डीजिस एक्ट 1897 च्या अनुसार प्राणी संग्रहालय प्रशासनांना उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागपूर येथील महाराजबाग प्राणी संग्रहालय १५ मार्चपासून बंद आहे. प्राण्यांची देखरेख करणारे कर्मचारी तिथेच राहत आहे. प्राण्यांमध्ये काही बदलाव दिसतोय, कोरोनाची काही लक्षण दिसत आहेत का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राण्यांच्या पिंजऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून त्याची खुराक देखील वाढवण्यात आला आहे. प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महाराजबाग प्रशासनाने 'डाएट चार्ट' देखील तयार केला आहे.

हेही वाचा... #corona: न्यूयॉर्कमध्ये वाघिणीला कोरोना, मुंबईच्या राणीबागेतील प्राण्यांची घेतली जातेय विशेष काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.