नागपूर - विदर्भ हे जंगलासाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच विदर्भाला वनपर्यटनासाठी राज्यातच नव्हे तर देशात वेगळी ओळख मिळाली आहे. पण याच विदर्भाची सीमा संपते तेथून पुढे मध्यप्रदेशात जंगल बुक मोगली लॅन्ड म्हणून प्रसिद्ध असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प काही खासच आहे. या मोगलीलँडकडे लक्ष वेधण्यासाठी पेंचकडे जाणाऱ्या कामठी रोडवर मेट्रोच्या पिल्लरवर खास चित्र रेखाटली आहे. हीच चित्र रात्रीच्या अंधारात लक्ष वेधणारी ठरत आहे.
हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा भाजपाकडून उपराजधानीत जल्लोष
जंगल बुक लहानपणी पाहणारी एक पिढी जरी आज मोठी झाली असली तरी ते मोगली पात्र आजही तेवढेच प्रसिद्ध आणि मनात घर करून बसले आहे. हे पात्र रंगावणारे प्रसिद्ध कादंबरीकार रुडयार्ड किपलिंग द्वारे लिखित जंगल बुक हे याच पेंचचा भाग असून मध्यप्रदेशमधील अमोदागढ हे तुम्हाला मोगलीच्या जवळ आणि बालपणात घेऊन जाते. जंगल सफारीमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशमध्येच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. 1975 साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले. फेब्रुवारी 1999 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला. तसा पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही मोठ्या प्रमाणात विस्ताराला गेला आहे.
जंगल बुकची कहाणी किंवा कथानक नागपूरपासून 100 किलोमीटरवर पुढे अमोदागढ या भागातील परिस्थितीवर लिहण्यात आल्याचे व्याघ्र प्रेमी तथा वाईल्डलाईफ फोटोग्राफर वरुण ठक्कर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. याच भागाला मोगली लँड असेही म्हटले जाते. ते मध्यप्रदेशच्या सिवनी पासून 32 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी असलेल्या ओम आकाराच्या नदीमुळे सुद्धा अमोदागढ नाव पडल्याचे काही लोक सांगतात. या ठिकाणी आजही प्रसिद्ध हिरा नदीच्या लगतच्या परिसरात नदी काठी भले मोठे दगड आहे. निसर्गरम्य सुंदर असा परिसर पाहायला मिळतो. पर्यटकांच्या आनंदात भर पडणारा हा भाग आहे. शिवाय मोगलीमधील शेरखान म्हणजे वाघोबाचे दर्शन हे व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करताना पाहायला मिळतेच.
महाराष्ट्राच्या सीमा भागात - टुरिस्ट स्पॉट म्हणून कोका लेक यासोबत तुम्हाला नाईट सफारीचा आंनद घेता येतो. पाटदेव वाघीण, लंगडी वाघीण, न्यू वाघीण, नाला वाघीण, सात ते आठ टायगर या भागात दिसत असल्याचे सांगितले जाते. मध्यप्रदेश मधून तूरिया कर्माझरी, जामतारा आहे. तेच महाराष्ट्रातील खुर्सापार, माणसिंगदेव, चोरबाहुली गेट, कुबाळा गेट हे नागपूर वरून 100 किलोमीटर अंतरावर बस टॅक्सी करून पोहोचून जंगल सफारी सुरू करता येऊ शकते.
हिरवीगार वृक्षे, विविध प्रकारची उंच वृक्षसंपदा, 1 हजार 200 पेक्षा अधिक झाडांच्या प्रजाती येथे आढळतात. जंगलातून वाहणाऱ्या पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भाग झाले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेला पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प 257 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारला आहे. ज्यामध्ये 10 टक्के भाग महाराष्ट्रात तर उर्वरित 90 टक्के भाग हा मध्यप्रदेश मध्ये येतो.
कादंबरी वास्तविक की काल्पनिक - याच मध्यप्रदेश भागात कादंबरीकार यांनी 1894 वर्षांच्या सुमारास मोगली लँडवर आधारित कादंबरी लिहिली. पुढील काळात ती अनेकांच्या पसंतीस उतरली. यात त्यांनी रंगवलेले काही पात्र हे काल्पनिक आहे. पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वरून ठक्कर सांगतात. जरी काहींच्या मते स्टोरी काल्पनिक असली तरी आजही अनेक दृश्य त्या भागात फिरायला गेल्यास नजरेस पडतात. तव मंदीर, उंच पहाड, दगड, झाड, असे एक ना अनेक बाबी नजरेस पडतात. तसेच 1800 शेच्या शतकात एक मुलगा बेपत्ता झाला आणि तोच पुढे मोगली या नावाने कादंबरीच्या माध्यमातून ओळखला जाऊ लागला असे वरून ठक्कर सांगतात.
महामेट्रोचा मोगली लँडसाठी पुढाकार कौतुकास्पद - नागपूर महामेट्रोने मेट्रोच्या पिल्लरवर मोगली चित्र रेखाटत याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम केले. पण मध्यप्रदेशच्या अमोदागढमध्ये मोगली लँडचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आजही अनेकांना मोगली लँड हा नेमका कुठला भाग आहे. हे माहीत नाही. त्यामुळे महामेट्रोने घेतलेल्या पुढाकाराने तरी लोकांचे लक्ष वेधले जावे. प्रत्येकाला मोगली लँड काय आहे हे समजावे. लोकांनी तिथे जाऊन पाहावे आणि कादंबरीतला मोगली स्वतः अनुभवता यावा, यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही वरुण ठक्कर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - Reaction of Minister Yashomati Thakur : विरोधी पक्षाचे फुटलेले मत आम्हाला मिळालेले असावे : यशोमती ठाकूर