ETV Bharat / city

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य अनंतात विलिन - वैद्य यांच्यावर अंत्यसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते मा.गो.वैद्य यांचे शनिवारी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य यांच्या पार्थिवावर आज नागपुरात अंत्यसंस्कार

author img

By

Published : Dec 20, 2020, 6:59 AM IST

Updated : Dec 20, 2020, 1:43 PM IST

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते मा.गो.वैद्य यांचे शनिवारी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून बरे झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. यामुळे त्यांना धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. वैद्य यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ते 97 वर्षांचे होते. आज सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीविळी सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अनिल देशमुख आदि उपस्थित राहिले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य अनंतात विलिन

मा. गो. वैद्य यांच्या अंत्यविधीपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले होते. अंत्यविधीनंतर दोन मिनिटांचे मौन बाळगत वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. तसेच संघाचे अनेक पदाधिकारी, विविध क्षेत्रातील, वर्धा जिल्ह्यातील मूळ गावातील चाहता वर्ग त्यांचा अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. दरम्यान, ३१ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बावनकुळे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा....

मी त्यांच्या संपर्कात अनेक वर्षांपासून काम करत आहे. समाज हिताचे काम कसे केले पाहिजे, याची शिकवण त्यांनी दिली. पालकमंत्री झालो असताना आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पाठीवर हात ठेवत समाजसाठी शेवटच्या घटकासाठी काम करत राहा. समजाला दिशा देणारे काम करत राहा, आशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले असल्याची भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. वैद्य यांनी संपूर्ण देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचा जीवनपट पाहता अंगात रक्त सळळेल इतके मोठे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या जीवनाच्या आधारावर आम्ही कार्य करण्याच्या प्रयत्न करू असेही बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांनी दिला जुन्या आठवणीना उजाळा....

संघाचे मोठे कार्य

वैद्य हे तरुण भारतचे माजी मुख्य संपादक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा.स्व.संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी संघाच्या अनेक प्रमुख पदावर काम केले होते. सामाजिक कारकिर्दीत त्यांनी संघाच्या अनेक प्रमुख पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अखिल भारतीय बैद्धिक संघाचे ते प्रमुख होते. तसेच विधान परिषदेचे सदस्य देखील होते.

गांधी हत्येनंतर भूमिगत राहून कार्य

मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. 1948 साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते शर्ट, पँट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही. हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा.गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपवली नाही. तसेच 1954-55 साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर करार करण्याचे नाकारले होते.

'तरुण भारत'मध्ये लिखाणास सुरुवात

मा.गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडल्यामुळे कॉलेजचे फार मोठे नुकसान झाले आहे असे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मोझेस म्हणाले. मात्र दुसरा कसलाही विचार न करता मा.गो. वैद्य हे 1966 मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले. यानंतर त्यांची संघाची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली. वैद्य यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत.

हेही वाचा - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो वैद्य यांचा संघ प्रवास..

Last Updated : Dec 20, 2020, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.