ETV Bharat / city

Litterateur Shripal Sabnis Nagpur : 'जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून महाराजांची सुटका करण्याची गरज' - विद्वानांच्या तावडीतून महाराजांची सुटका करण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हयात नाहीत, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही बाजूने इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. औरंगजेबाच्या तावडीतून महाराज सुटले. मात्र आता या जातीवादी विद्वानांच्या तावडीतून महाराजांची सुटका करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक ( Litterateur Shripal Sabnis Nagpur ) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस ( Former President of Bharatiya Marathi Sahitya Sammelan Shripal Sabnis ) यांनी व्यक्त केले आहे.

साहित्यिक श्रीपाल सबनीस
साहित्यिक श्रीपाल सबनीस
author img

By

Published : Apr 18, 2022, 7:00 PM IST

Updated : Apr 18, 2022, 7:21 PM IST

नागपूर - राज्यात सध्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाला धरून निर्माण झालेल्या वादाच्या मूळाशी आजचे विद्वानच कारणीभूत असल्याची परखड टीका ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हयात नाहीत, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही बाजूने इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. औरंगजेबाच्या तावडीतून महाराज सुटले. मात्र आता या जातीवादी विद्वानांच्या तावडीतून महाराजांची सुटका करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक ( Litterateur Shripal Sabnis Nagpur ) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस ( Former President of Bharatiya Marathi Sahitya Sammelan Shripal Sabnis ) यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस

महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था किडलेली असेल आणि शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धर्माचे आणि राजकारणाची दुकानदारी होत असेल तर त्याचे मूळ कारण हे विद्वान आहे. सत्याचे करप्शन करणारे इतिहासकार आहे. ते दोन्ही बाजूने आहे, ब्राह्मण परंपरेत आहे. ब्राह्मणेत्तर परंपरेतही आहे, अशी परखड टीका श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

'याला विद्वत्ता म्हणायची का'? : एक म्हणतो शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते. तर दुसरा म्हणतो रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे शत्रू होते. दुर्दैवाने दोघांकडेही पुरावे नाहीत. रामदासांच्या व्याभिचाराबद्दल काही ब्राह्मणेतर इतिहासकारांनी आपले मत मांडले आहे. रामदास स्वामींचा व्याभिचार शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईक यांच्यामार्फत कळाला नाही. पण साडेतीनशे वर्षे जुना हा इतिहास आजच्या विद्वानाना कळतो. याला विद्वत्ता म्हणायची का इतिहास म्हणायचा? असा सवाल सबनीस यांनी उपस्थित केला.

'इतिहासात विष पेरण्याचे काम झाले' : रामदास शिवाजींचे गुरू नव्हते. मात्र ते शिवाजी महाराजांचे शत्रूही नव्हते. काही ब्राह्मणेतर विद्वान त्यांना औरंगजेबाचा हेर ठरवतात. शिवाजी महाराजांचा गुणगान करणारे, संभाजी महाराजांचा उपदेश करणारे अनेक काव्यरचना रामदास स्वामींच्या आहेत. त्यामुळे त्यांना संत माना किंवा नको माना, ते जंत कसे होऊ शकतात. ते शत्रूचे हेर कसे होऊ शकतात, असा प्रश्न सबनीस यांनी विचारला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने इतिहासाची दिशा बदलली आहे. विष पेरण्याचे काम झालेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या विद्वानांना विनंती आहे, की तुमच्या भांडणांमध्ये शिवाजी महाराजांची एकात्म भूमिका होरपळून जाऊ देऊ नका, असे सबनीस म्हणाले.

'माझा भोंगा सत्याचा' : माझा भोंगा हा सत्याचा आहे दुसऱ्यांचा भोंगा कशाचा आहे, याच्याशी मला काही देणे घेणे नाही. सत्य हे सर्वंश्रेष्ठ आहे. सत्यासाठी जगणे आणि मरणे यालाच आपण संस्कृती म्हणतो. ज्याला कुणाला देशाचे हित डोळ्याआड करून भोंगा वाजवायचा असेल संविधानाची साक्ष ठेवून वागावे. याचे राजकीय व्यवस्थेने अनुकरण करावे. संविधान पायदळी तुडविण्याचे काम कोणीही करू नये. राजकीय व्यवस्था वाकलेली आहे. सामान्य माणसांने स्वतः अस्तित्व कुठल्या तरी एक पक्षाकडे जाऊन आपले अस्तित्व संपवू नये, मेंदू गहान न ठेवता स्वतंत्र लोकशाहीवादी समाजवाद संविधान सुसंगत विवेकनिष्ठ सत्यनिष्ठ भूमिका जनतेने घेतली पाहीजे. यासाठी माझा हा जागर असल्याचेही श्रीपाल सबनीस म्हणाले.

'सत्तेत सध्या एकमेकांचे कपडेफाड सुरू आहे' : सत्ता ही परिहार्य आहे, पण ती सत्ता सत्याशी सुसंगत असावी, ती असत्याची कैवार घेणारी सत्ता तरी काय कामाची आहे. सत्यनिष्ठा हा सत्ताधाऱ्यांच्या केंद्रबिंदू असला पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना मला दिसत नाही. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत एकमेकांची कापडेफाड सुरू असते. सगळे नागळे होत आहे. चांगले की वाईट जे नागरिकांनी ठरवावे. सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न वाऱ्यावर आहे. त्यामुळे सत्तेचे प्रश्न महत्वाचे वाटत नाही. धर्माचा नावावर गळे कापण्याचे काम सुरू आहे आणि हेच मला होऊ द्यायचे नाही, असेही श्रीपाल सबनीस म्हणाले.

हेही वाचा - Home Minister On Loudspeakers : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे

Last Updated : Apr 18, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.