ETV Bharat / city

नागपुरात मिनी लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवेत दारू दुकानांचाही समावेश?

author img

By

Published : Feb 28, 2021, 9:49 AM IST

जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असून देखील प्रशासनाने दारूच्या दुकानांना या कोरोना प्रतिबंधात्मक नियमातून वगळली आहेत. त्यामुळे दारूची दुकाने अत्यावश्यक सेवेत कशी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर या प्रश्नी खुद्द पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील यावर उत्तर देणे टाळले आहे.

nagpur
अत्यावश्यक सेवेत दारू दुकानांचाही समावेश?

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवल्या. यात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मात्र, शहर व जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असून देखील प्रशासनाने दारूच्या दुकानांना या कोरोना प्रतिबंधात्मक नियमातून वगळली आहेत. त्यामुळे दारूची दुकाने अत्यावश्यक सेवेत कशी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर या प्रश्नी खुद्द पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील यावर उत्तर देणे टाळले आहे.

नागपूर
नितीन राऊत पालकमंत्री
नागपुरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला पायबंध घालण्यासाठी शहरात बंद पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावर नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत घराबाहेर पडणे टाळले. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी या बंदमध्ये सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, भाजीपाला, औषधालये, रुग्णालयांसह शहरातील दारूची दुकानेही सुरूच असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दारू दुकानांचा देखील अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे का? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
नागपुरात मिनी लॉकडाऊन

पालकमंत्र्यांनी उत्तर टाळले-

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात शनिवार, रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आवाहनानुसार शनिवारी बंद सुरू करण्यात आला. याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हे सीताबर्डी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला, आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे हे आद्य कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, अत्यावश्यक सेवेसह दारूच्या दुकांनासही मुभा का? हा प्रश्न विचारला असता, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

मनपा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय -

नागपूर शहरात दारू दुकाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. दारू विक्री बंद असायला हवी मात्र, ते चालू किंवा बंद ठेवण्याचे आदेश देण्याचे काम मनपा प्रशासनाचे आहे. तसेच हा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील विषय असल्याची प्रतिक्रिया महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

अखेर निर्णय झाला... दारूची दुकानेही राहणार बंद

दिवसभराच्या हालचालीनंतर अखेर प्रशासनाला दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आले असावे, त्यानंतर प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन आज पासून बंद काळात दारूची दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.