ETV Bharat / city

अनिल देशमुखांविरोधात तक्रार करणारे वकील तरुण परमार कागदपत्रांसह 'ईडी'समोर हजर - Anil Deshmukh money laundering case

अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्याची तक्रार करणाऱ्या वकिलांना ईडीने नोटीस बजावली आहे.

ed
संग्रहित फोटो
author img

By

Published : Jun 28, 2021, 7:39 PM IST

नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्याची तक्रार करणाऱ्या वकिलांना ईडीने नोटीस बजावली आहे. वकिलांच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडे असलेले कागदपत्र घेऊन आज 11 वाजता ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. यामुळे तरुण परमार हे मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

  • वकील तरुण परमार यांच्याकडून तक्रार दाखल -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात नागपूरचे वकील तरुण परमार यांनी काही दिवसांपूर्वी एक तक्रार ईडीला केली होती. यामध्ये अनिल देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंगमध्ये पैसे गुंतवले आहेत, असे तक्रारीत नमूद केले होते. विशेष म्हणजे मागील महिन्यात ईडीने नागपुरातील दोन सीएच्या घरावर छापे टाकले होते. हे पैसे याच सीएच्या माध्यमातून गुंतवल्याचे ईडीच्या तपासात पुढे आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तरुण परमार यांच्याकडे काय कागदपत्र आहेत, ते आज ईडीकडून तपासले जातील. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये वकील तरुण परमार यांनी आणखी एका मंत्र्याच्या तसेच काही अधिकाऱ्यांच्या संदर्भातसुद्धा ईडीकडे तक्रार केली आहे.

  • परमबीर सिंह यांचे आरोप -

दरम्यान, 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यानंतर देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला. देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. नागपुरातील त्यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वीच ईडीने छापेमारी करत तब्बल 9 तास चौकशी केली. यापूर्वी सीबीआयने 24 एप्रिलला गुन्हा दाखल करत दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी केली होती.

  • काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. अनेक रेस्टॉरंट आणि बार मालक तसेच इतर ठिकाणाहून पैसे जमा करता येईल. पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देण्यात आले होते, असे गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांच्या मागे सीबीआय आणि ईडीची चौकशी लागली आहे. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.