ETV Bharat / city

झारखंड सरकार पडण्याचा डाव; चौकशीसाठी तयार असल्याचं बावनकुळेंचं विधान - bjp leader chandrashekahr bawankule

झारखंड सरकार पाडण्याच्या कटात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते सहभागी असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला आहे. या षडयंत्राचे केंद्रबिंदू नागपूर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपाचे अनेक नेते तपास यंत्रणेच्या रडारवर येणार आहेत. सध्या पुढे येत असलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काटोल येथील भाजपा नेते चरणसिंग ठाकूर आणि या जयकुमार बेलखोडे यांचे नावं पुढे आले आहेत.

झारखंड सरकार पाडण्याचा डाव
झारखंड सरकार पाडण्याचा डाव
author img

By

Published : Jul 28, 2021, 12:04 PM IST

Updated : Jul 28, 2021, 5:05 PM IST

नागपूर - झारखंड सरकार पाडण्याच्या कटात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते सहभागी असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला आहे. या षडयंत्राचे केंद्रबिंदू नागपूर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपाचे अनेक नेते तपास यंत्रणेच्या रडारवर येणार आहेत. सध्या पुढे येत असलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काटोल येथील भाजपा नेते चरणसिंग ठाकूर आणि या जयकुमार बेलखोडे यांचे नावं पुढे आले आहेत. जयकुमार बेलखोडे हे या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे झारखंड पोलिसांकडून सांगितले जात आहे. या संदर्भात बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की झारखंड पोलिसांकडून मला अद्याप चौकशी संदर्भात कोणतीही नोटीस किंवा समन्स मिळालेला नाही. भविष्यात अशी चौकशी होणार असेल तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

झारखंड सरकार पडण्याचा डाव; चौकशीसाठी तयार असल्याचं बावनकुळेंचं विधान

महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता

झारखंड पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या सरकारला पडण्याचे षडयंत्र रचले जात होते. या अंतर्गत आमदारांची खरेदी विक्री करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. या संदर्भात अनुप सिंग नावाच्या आमदाराने केलेल्या तक्रारींवरून झारखंड पोलिसांनी रांची येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून तिघांना अटक केली होती. यामध्ये निवारण महतो, अमित सिंग आणि अभिषेक दुबे यांचा समावेश आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाजपा नेते झारखंड सरकार पडण्याचे षडयंत्र रचत आहेत. झारखंड पोलिसांच्या या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे.

चौकशी होणार का?
झारखंड सरकार पाडण्याचा डाव हाणून पाडल्याचा दावा झारखंड पोलिसांनी केला आहे. यामागे भाजपाचे नेते असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांची नावं सध्या पुढे आली आहेत, ते सर्व नागपूर शहर आणि जिल्ह्यातील असल्याने झारखंड येथील तपास यंत्रणा नागपूरला येऊन या तिघांनी चौकशी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पुढे येत असल्याने त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, मी राष्ट्रीय पातळीवर नेता नाही तरी देखील माझी चौकशी झाल्यास मी पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.

बावनकुळे यांचा खुलासा
या प्रकरणात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पुढे आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काल बावनकुळे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की आजवर मी कधीही झारखंड राज्यात गेलो नाही, त्यामुळे मी या कटात सहभागी असल्याचा आरोप हा हेतुपुरस्सर करण्यात येत असल्याचे ते म्हणाले आहेत. मी झारखंड येथील एकाही आमदाराला ओळखत देखील नाही. त्यामुळे या आरोपांमध्ये जराही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा - संसदेचे काम चालविण्याची सत्ताधारी पक्षावर अधिक जबाबदारी- संजय राऊत

Last Updated : Jul 28, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.