नागपूर - कन्यका नागरी सहकारी बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात 16 संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यामध्ये बँकेची कुठली चुक नाही. नियमानुसारच आवश्यक कागदाची पुर्ततेनंतर कर्जवाटप करण्यात आल्याचे बँकेचे संचालक तथा आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Kanyaka Nagari Sahakari Bank) यावेळी बँक संचालक म्हणून लागलेले आरोप त्यांनी फेटाळले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कन्यका सहकारी बँकेकडून दिलेले कर्ज ह बनावट कागदपत्रांद्वारे वाटप केल्याने 16 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये बँकेचे संचालक तथा चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवर यांचेही नाव आहे.
भूखंड बँकेने विक्रीस काढला
नागपुरातील मनोहर कऱ्हाडे नामक व्यक्तीच्या मालकीच्या जमिन बनावट कागपत्राद्वारे स्वपनील भोंगाडे याने (2013)मध्ये 1 कोटी 25 लाखाचे कन्यका नागरी सहकारी बँकेकडून कर्ज उचलले. यात मात्र मनोहर कऱ्हाडे हे अमेरिकेला स्थायिक झाले असून त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण मनोहर कऱ्हाडे यांची पत्नी शीला कऱ्हाडे या भारतात आल्यावर त्यांचा मालकीचा भूखंड बँकेने विक्रीस काढला असल्याचे समजले. त्यामूळे त्यांची फसवणूक झाल्याची तक्रारी बजाज नगर पोलिसांत केली. यावरून कन्यका नागरी सहकारी बँकेच्या 16 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्यका सहकारी बँकेकडून (2013)मध्ये सुमित भोंगाडे नामक व्यक्तीला कर्ज दिले गेले होते.
काय आहे कर्ज कर्जप्रकारण
मनोहर कऱ्हाडे यांचा नावाचा भूखंड गहाण करून 1 कोटी 25 लाखाचा कर्जाची उचल करण्यात आले होते. पण ते कर्ज बुडाले असेही म्हणता येणार नाही. कर्ज वसुलीची आवश्यक प्रक्रिया बँकेकडून केली जात आहे. कन्यका बँकेचे काम विश्वसनीय बँक म्हणून सुरू आहे. एवढेच नाही तर आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेकडे एनपीए झालेले खातेधारक नाही. त्यामुळे 32 वर्षात पहिल्यांदा अशा पद्धतीच प्रकार कर्जदाराच्या चुकीमुळे घडला आहे. यात बँकेची चूक नसून कर्जदाराची चूक आहे. तसेच संपत्ती मॉर्गेज करतात ती संपत्ती कोणाची आहे हे तपासण्याचे काम दुय्यम निबंधक यांचे आहे. रजिस्ट्री होताना त्यांनी ते तपासायला पाहिजे होते. बँकेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कर्ज दिल्याचेही बँकेचे संचालक तथा आमदार किशोर जोरगेवार पत्रकार परिषदेत म्हणालेत.
बँकेतील ठेवीदारांचे पैशे सुरक्षित
या प्रकरणामुळे ठेवीदारांच्या पैशाला धोका नाही. बँक नफ्यात आहे. स्वपनील भोंगाडे यांच्याकडून बँकेच्या कर्जाच्या वसुलीची कारवाई सुरू आहे. पण यापुढे कर्ज वाटप करताना सर्व खबरदारी घेऊन कर्ज वाटप करू असेही बँकेचे संचालक म्हणालेत. यावेळी बँकेचे अध्यक्ष आणि इतर संचालक मंडळी उपस्थित होते.
हेही वाचा - Ajit Pawar In Pune : सन्माननीय व्यक्ती काहीही वक्तव्य करतात! भर सभेत पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार