ETV Bharat / city

जागतिक कलावंत दिन : रंगभूमीवर पुन्हा नाटकांची तिसरी घंटा वाजू दे

जागतिक कलावंत दिनाच्या निमित्ताने दोन वर्षाच्या प्रदीर्घ वर्षानंतर रंगभूमी पुन्हा नव्याने सुरू होत आहे. या कोरोनाच्या काळात कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागली. कलाकारांचे पुन्हा सुगीचे दिवस येऊ अशीच प्रार्थना हे कलाकार व्यक्त करत आहेत.

जागतिक कलावंत दिन
जागतिक कलावंत दिन
author img

By

Published : Oct 25, 2021, 7:45 PM IST

Updated : Oct 25, 2021, 11:06 PM IST

नागपूर - कोरोनाच्या जागतिक महामारीने कला क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना मोठा तोटा सोसावा लागला आहे. कलाप्रेमी आणि कलकार कोरोनाचा संकटाचा पडदा हटावा आणि त्यावर कलेचे सादरीकरण व्हावे अशी आशा व्यक्त करत आहे. यात राज्यसरकारने परवानगी दिली आहे, तरीही आलेली मरगळ दूर होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा लागणार आहे. याचाच आढावा जागतिक कलाकार दिनी ईटीव्ही भारत कडून घेण्यात आला आहे.

जागतिक कलावंत दिन : रंगभूमीवर पुन्हा नाटकांची तिसरी घंटा वाजू दे

यासाठी कलाप्रेमीनी त्यांच्या भूमिकेला व्यासपीठ दिल्याने आभार ही मानले आहे. नागपूरच्या कलाभूमीला मोठा इतिहास आहे. याच भूमीत 1985 मध्ये 65 वे नाट्य संमेलन झाले. त्यावेळी तयार करण्यात आलेली नटेश्वराच्या मूर्तीचे आजही नागपुचे जेष्ठ कलावंत प्रभाकर ठेंगळी यांच्याकडून जतन केले जात आहे. कला क्षेत्राचा इतिहास सांगताना प्रभाकर ठेंगळी म्हणतात की कलावंतामध्ये कलेप्रती असलेले समर्पण आजच्या काळात दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे नवीन तरुणाईला मोबाईल किंवा नवीन जगातील डिजिटल प्लॅटफॉर्मवर यासारखे साधना पाहता कला क्षेत्राला व्यवसायिक स्वरूप आले. त्यामुळे आजकाल नवीन पिढीतील कलावंत मंडळी बदलत्या जगासोबत गतिमान झाले. पण सगळं काही झटपट मिळवण्याची घाई ती सुद्धा आज दिसून येत आहे.

International artist day
रंगभूमीवर पुन्हा नवचैतन्य निर्माण होईल

कलाकारांचे पुन्हा सुगीचे दिवस येण्याची प्रार्थना

एखादा कलाकार उंच पातळीवर असला तर त्यानंतर तो कलाक्षेत्रातील पर्वताच्या उंच शिखरावर आहे तोच कायम राहील असे होत नाही. एखाद्या व्यक्ती कलेत श्रेष्ठ असला तरी उद्या त्याहून अधिक उंची गाठणारा दुसरा कलाकार येतोच. क्रिकेट क्षेत्रात सुनील गावस्कर नंतर सचिन धोनी, विराट कोहली, तसेच कला क्षेत्रात दिलीप कुमार हे होतच राहील, असेही त्यांनी सांगितले. या काळात मेकअप आर्टिस्ट, नेपथ्य, लाईट यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. काही मंडळींनी पैसे गोळा करून मदत केली. पण त्यालाही शेवटी मर्यादा आल्या आहे. त्यांना कौटुंबिक पातळीवर यातना सोसाव्या लागल्या आहे. त्या कलाकारांचे पुन्हा सुगीचे दिवस येऊ अशीच प्रार्थना अभिनेता दिग्दर्शक संजय भाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - दिल्लीतील NCB चे वरिष्ठ अधिकारी उद्या मुंबईत; समीर वानखेडेंवरील आरोपांची करणार चौकशी

Last Updated : Oct 25, 2021, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.