ETV Bharat / city

प्रत्येक महिन्यात १८ महिलांवर अत्याचार, माहिती अधिकारातून समोर आली धक्कादायक बाब..... - etv bharat live

तीन वर्षात 3289 महिलांवर अत्याचार झाले आहेत. त्यानुसार दर महिन्याला सरासरी १८ महिलांवर अत्याचार होतात. २०१९ मध्ये महिलांच्या अत्याचारासंदर्भात १३६ गुन्हे दाखल झाले होते. तर २०२० मध्ये ही संख्या १७२ पर्यत गेल्याचे माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

violence against women
violence against women
author img

By

Published : Oct 21, 2021, 5:01 PM IST

नागपूर - गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये राज्यात सर्वात आघाडीवर असलेल्या उपराजधानी नागपूरने महिला अत्याचाराच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतली आहे. कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून हे आकडे समोर आले आहेत. तीन वर्षांत महिलांच्या संदर्भात किती गुन्हे घडले आहेत याची विचारणा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात अंतर्गत गुन्हे शाखेकडे केली होती. गेल्या तीन वर्षाच्या काळात नागपूर शहरात 3289 गुन्ह्यांची नोंद झाली असून, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचारासह महिलांच्या तस्करीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यात सातत्याने वाढ होताना दिसून येते.

प्रत्येक महिन्यात १८ महिलांवर अत्याचार

अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार तीन वर्षात 3289 महिलांवर अत्याचार झाले आहेत. त्यानुसार दर महिन्याला सरासरी १८ महिलांवर अत्याचार होतात. २०१९ मध्ये महिलांच्या अत्याचारासंदर्भात १३६ गुन्हे दाखल झाले होते. तर २०२० मध्ये ही संख्या १७२ पर्यत गेली होती. यावर्षी या हेड अंतर्गत १४९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

महिलां संदर्भात घडलेले वर्षनिहाय गुन्हे
२०१९ या वर्षात नागपूरमध्ये हुंडाबळीच्या ५ घटनांची नोंद झाली होती. तर २०२० मध्ये हा आकडा ८ वर गेला होता. तर यावर्षी या हेडमध्ये एकही गुन्ह्याची नोंद झाली नाही.आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात २०१९ साली १० , तर २०२० मध्ये ७ आणि यंदा सात गुन्ह्यांची नोंद नागपूर पोलिसांकडे झाली आहे. याशिवाय कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना देखील चिंता वाढवणाऱ्या आहेत. २०१९ साली १३६ गुन्ह्याची नोंद झाली होती. तर २०२० साली ११८ गुन्ह्याची नोंद झाली. यंदा १०३ गुन्हे नोंद झाले आहेत.

अपहरण आणि महिला तस्करीच्या घटनांमध्ये वाढ
नागपूर गुन्हे शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये महिला अपहरणाच्या हेडअंतर्गत २०१९ मध्ये ४०४ गुन्हे घडले होते. तर २०२० मध्ये २४६ गुन्ह्यांची नोंद आहे. यावर्षीच्या १० महिन्यात हा आकडा २३९ पर्यत गेलेला आहे. महिला तस्करीच्या घटनादेखील वाढल्या आहेत. २०१९ मध्ये १८ महिलांची तस्करी केल्याप्रकरणी तर २०१० मध्ये ही संख्या दुप्पट म्हणजेच ३३ इतकी झाली होती. तर यावर्षी हा आकडा १० पर्यंत गेलेला आहे.

लहान मुलांच्या संदर्भातील गुन्हे वाढले
२०१९ मध्ये बाललैंगिक(पोक्सो) या कलमाअंतर्गत २००, २०२० साली २३८ आणि २०२१ मध्ये १४२ गुन्ह्यांची नोंद नागपूर पोलिसांकडे झालेली आहे. लहान मुलांच्या विक्रीच्या घटना २०१९ आणि २० साली दोन घडल्या होत्या. मात्र, यावर्षी एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा - निर्दयी शिक्षक : वर्गातच केली सातवीच्या विद्यार्थ्याला मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू; वाचा कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.