ETV Bharat / city

VIDEO : 7 वर्षीय राघवने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, चक्रासन करत तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरला - राघव भांगडे रेकॉर्ड

सात वर्षीय राघव भांगडेने कोवळ्या वयात तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याने चक्रासन करत तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरून हा किर्तीमान नोंदवला. विशेष म्हणजे, तो 73 सेकंदात 102 पायऱ्या उतरला.

Raghav Bhangde did Chakrasana
राघव भांगडे चक्रासन नागपूर
author img

By

Published : Dec 7, 2021, 4:37 PM IST

नागपूर - सात वर्षीय राघव भांगडेने कोवळ्या वयात तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याने चक्रासन करत तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरून हा किर्तीमान नोंदवला. विशेष म्हणजे, तो 73 सेकंदात 102 पायऱ्या उतरला.

माहिती देताना राघवचे वडील, प्रशिक्षक, स्वत: राघव, मंत्री सुनील केदार आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Mini Petrol pump at home! घरातच थाटला मिनी पेट्रोल पंप! १२ हजार लिटरचा साठा पकडला महिलेसह तिघांना अटक

सात वर्ष चिमुकल्याने कोवळ्या वयात तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. चक्रासन करत तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरत हा किर्तीमान नोंदवला आहे. विशेष म्हणजे किर्तीमान करतांना 102 पायऱ्या केवळ 73 सेकंदात खाली उतरला आहे. मस्तीखोर असलेल्या राघवला पालकांनी कंटाळून खेळाकडे वळले. पण, आता त्याने तीन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले आहेत.

नागपूरच्या भांगडे कुटुंबीयांतील राघवने आज हाय रेंज वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ डिसेंड इन चक्रासन हा विक्रम नोंदवला आहे. पण, हा रेकॉर्ड नोंदवत त्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. 2019 मध्ये त्याने 60 सेकंदात 125 रूफ टाईल्स तोडून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्यानंतर 2020 मध्ये त्याने चक्रासन करत 102 पायऱ्या चढल्या. यातच त्याने 1 मिनीट 11 सेकंदात चक्रासन करत अगदी गतीने पायऱ्या खाली उतरत नवीन विक्रम रचला होता. सात वर्षांचा राघव एकामागून एक विक्रम नोंदवत आहे. यासोबतच तो कराटे नियमित करतो. लवकरच तो ब्लॅक बेल्ट मिळवेल, असेही त्याचे प्रशिक्षक विजय तिजारे सांगतात.

मस्तीखोर राघव खेळायला लागला आणि पुरस्कार मिळवत गेला

राघवच्या अंगात शारीरिक ऊर्जा भरभरून आहे. अवघ्या अडीच वर्षांचा असताना दिवसभर मस्ती करून तो आई वडिलांच्या नाकी नऊ आणायचा. त्यामुळे, त्याच्या अंगातील शारीरिक ऊर्जा ही खेळात वळवण्यासाठी त्याला कराटेचे प्रशिक्षण सुरू केल्याचे वडील साहिल भांगडे सांगतात. जिथे इतर मुलांना शिकायला आठवडा, 15 दिवस जायचे तिथे तेच बारकावे अवघ्या एक दोन दिवसांत तो शिकून घ्यायचा. त्यामुळे, त्याला याचा फायदा अधिक होत गेला. हळूहळू प्रशिक्षकाचे मार्गदर्शन आणि आई वडिलांची तयारी असल्याने त्याने भूतान ऑलिम्पिक नामक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कराटेमध्ये सहभाग नोंदवत ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल मिळवले.

खेळातील या उर्जेला संधी उपलब्ध करून देणे गरजेचे

राघव वयाच्या सातव्या वर्षी भविष्यात ऑलिम्पिकमध्ये खेळून देशासाठी गोल्ड मेडल आणायचे स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन खेळत आहे. तेच त्याला खेळण्याबरोबर वडिलांप्रमाणे अभ्यास करून वकील बनायचे आहे. त्याचे आज महाराष्ट्राचे क्रीडा कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गौरव झाला. राघवसारख्या उर्जावान मुलांना जोपासने आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे, यासोबतच त्याना शास्त्रीय पद्धतीने खेळात निपूण करणे हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे काम आहे, ते आम्ही करू, असेही त्यांनी आश्वस्त केले.

राघवच्या विक्रमातून इतर पालकांनी प्रेरणा घेण्याची गरज

राघवला या यशासाठी अधिक परिश्रम करावे लागले. रोज चार तास चक्रासनमध्ये खाली उतरण्याचा सराव तो करत होता. खालच्या माळ्यावरून वर जाण्यासाठीचा विक्रम राघवने अगोदरच सराव करून केलेला होता. राघवने कोवळ्या वयात कराटे आणि या सगळ्या क्षेत्रात सुरू केलेला प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे, त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा - Omicron In Maharashtra : ओमायक्रॉनचा धोका वाढल्याने नागपूरच्या आमदार निवासातील कोविड केअर सेंटर सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.