ETV Bharat / city

२४ तासात नागपूर जिल्ह्यात ४७ रुग्णांचा मृत्यू तर ३७२० कोरोना बाधित

गेल्या २४-तासात राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात ३७२० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज सुद्धा नागपुरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

२४ तासात नागपूर जिल्ह्यात ४७ रुग्णांचा मृत्यू तर ३७२० कोरोना बाधित
२४ तासात नागपूर जिल्ह्यात ४७ रुग्णांचा मृत्यू तर ३७२० कोरोना बाधित
author img

By

Published : Apr 3, 2021, 9:45 PM IST

नागपूर - गेल्या २४-तासात राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात ३७२० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज सुद्धा नागपुरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. २४ तासात नागपूर मध्ये तब्बल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर या तीन दिवसांमध्ये १४७ रुग्णांनी आपला जीव गमावलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली असून यामध्ये मृत्यूची संख्या कमी करण्यावर चर्चा झाली आहे.

३६६० कोरोना बधितांची कोरोनावर मात-

काल (शुक्रवार) नागपूर शहरात आणि जिल्हात ४१०८ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज (शनिवार) हा आकडा काहीसा कमी झालेला आहे. शनिवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३७२० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज ३६६० कोरोना बधितांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे, ज्यामुळे सध्या नागपुरात ४० हजार ८२० इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये तब्बल १५५९३ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत,ज्यामध्ये १२३७६ इतक्या आरटीपीसीआर आणि ३२१७ अँटीजेन टेस्टचा समावेश आहे. आज बाधित झालेल्या ३७२० नागरिकांमध्ये ११२६ रुग्ण ग्रामीण नागपूरचे तर २५८९ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. आज ४७ कोरोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या ही ५२६५ इतकी झाली आहे.

हेही वाचा- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, बदलीसाठी पैसे घेणारा तो नेता कोण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.