नागपूर - पतीने काही वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या पत्नीची गळा कापून हत्या (Husband kill Wife) केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी येथील ढिवरपुरा येथे ही घटना घडली. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही महिला पतीच्या घरी गेली होती. तिथेच दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने पत्नीची हत्या केली. छाया रामदास बोरीकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रामदास बोरीकर असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण - मृत छाया बोरीकर आज मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी विभक्त झालेली पती रामदास बोरीकर यांच्या घरी गेल्या होत्या. कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये कडक्याचे भांडण झाले. संतापलेल्या रामदास यांनी पत्नी छायाच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
2017 साली झाले विभक्त - आरोपी रामदास बोरीकर आणि मृत छाया हे 2017 पासून विभक्त राहत होते. पण दोघेही एकाच वस्तीत वेगवेगळे राहत होते. रामदास आणि छायाचा मुलगा सतीश याचे 9 जूनला लग्न होते.
हेही वाचा - Nagpur Crime : जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकणाऱ्या चौघांना अटक, लाखो रुपाये किमतीचे स्टॅम्प जप्त