नागपूर - विदर्भातील उन्हाचे चटके यंदा (Heat Wave) चांगलेच जाणवू लागले आहे. मे महिन्यात तापमान वाढून वाढून उच्चांक गाठते. पण यंदा मागील अनेक वर्षाचे विक्रम एप्रिल महिन्यातच मोडीत निघाले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळा हा त्रासदायक आणि जिव्हाची लाही लाही करणारा ठरत आहे. नागरिकांनी या उष्णतेच्या लाटेपासून कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जायस्वाल यांच्याकडून ...
यंदा मे महिन्यातील येणाऱ्या उष्णतेच्या लाटा चक्क एप्रिल महिन्यात अनुभवास आलेल्या आहे. यातच तापमान सरासरी 45 अंशाच्या घरात पोहचले आहे. नागरिकांना सकाळपासूनच उष्णतेचा सामना करावा लागत आहे. यात उष्माघात यातील सर्वात भयंकर असा परिणाम आहे. यात यात प्राथमिक नोंदणीनुसार उपराजधानी नागपुरात काही लोकांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत आहे.
शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे
यात उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी उन्हात जाणे शक्यतोवर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरे यात शरीराचे तापमान वाढत असल्याने पाणी पातळी कमी होते. त्यामुळे सातत्याने पाणी पीत राहण्याचा सल्ला वैदकीय तज्ञ सांगतात. यामुळे तहान लागत नसली तरी पाणी प्या असेही आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल सांगतात. घराबाहेर पडताना कामाचा विभागणी करून सकाळच्या पहिल्या टप्प्यात आणि संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात कामाची वाटणी करून घ्यावीत. वयोवृद्ध, लहान मुलं आणि गरोधर महिलांनी प्रखर उन्हात जाणे टाळावेच. पण घरातही विशेष लक्ष ठेवून काळजी घ्यावी असेही तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा - Heat wave affects comorbidities : उष्माघातापासून वाचण्यासाठी 'ही' घ्या काळजीघराबाहेर पडताना अशी घ्या काळजी
मोठ्या प्रमाणात नोकरदार किंवा कामगार वर्गाला उन्हात फिरून काम करावे लागते. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची अधिक गरज आहे. ऋतुप्रमाणे आपल्या पोशाखात बदल करण्याचाही सल्ला डॉक्टर देतात. उन्हाळयात सैलदार (ढिले ढाले), खादीचे (कॉटन) पांढरे कपडे घालावे. डोके आणि कान झाकून ठेवावे. कानावाटे गरम हवा जाणून अनेकदा अंधारी येणे, चक्कर येण्यासारखे त्रास उन्हाळ्यात जाणवते. थोडा वेळ शरीराचे तापमान नॉर्मल करून बाहेर पडावे. घराबाहेर असताना जिथे गळा कोरडा वाटत असेल तेव्हा पाणी प्यायल्याच पाहिजे. यासाठी पाणी बाटली सोबत ठेवावी. शरीर पाण्याची पातळी समतोल राहावे याकडे लक्ष द्यावे.
खाद्यपदार्थसह पेय पिण्यावर द्यावा भर
उन्हाळ्यात जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. उन्हाळ्यात लिंबू पाणी, रसदार फळे खावे, यामुळे शहरातील पाणी पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यात घरात दही ताक हे पिण्यासाठी उत्तम पेय ठरतात. टरबूज, खरबूज यासारखे रसदार फळे ज्यात पाणी अधिक असते त्याचे सेवन करावे. जेणेकरून पाणी पातळी टिकविण्यास मदत होते.
विदर्भातील हिटस्ट्रोकची परिस्थिती
नागपूर सोडून पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यात उष्मघाताचे संशयित रुग्ण नाही. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे डोळ्यांचा त्रास, अंगावर उष्णतेमुळे पुरळ येणे, यासह उष्णतेमुळे नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात 2927 रुग्ण मिळून आले. तेच चंद्रपूर जिल्ह्यात 851 रुग्ण आढळले. वर्ध्यात 469 रुग्ण, गडचिरोली 58, भंडारा 38, गोंदिया 42 अश्या पद्धतीने उष्णतेपासून त्रास झाला. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जायस्वाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.
हेही वाचा - Heat wave affects comorbidities : उष्माघातापासून वाचण्यासाठी 'ही' घ्या काळजी