नागपूर - भारत देशाच्या हृदयस्थानी वसलेल्या नागपूर शहराचा इतिहास फारच रंजक आणि ऐतिहासिक आहे. त्यापैकीचं एक म्हणजे ३०० वर्षे जुनी कलाकार आणि चित्रकारांची वस्ती म्हणून ओळख मिळालेली चितारओळ. राजे रघुजी भोसले यांनी साधारपणे ३०० वर्षांपूर्वी चितारओळीची ( Chitaroli Nagpur ) निर्मिती केली होती. राजे रघुजी भोसले यांच्या ( Raje Raghuji Bhosale ) वाड्यापासून काहीच अंतरावर आलेल्या चितारओळीत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्राथमिक काळात या वस्तीत सर्वाधिक चित्रकार राहायचे त्यामुळे याला चित्रकारांची ओळ म्हणून प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर कालांतराने चित्रकार या शब्दाचे रूपांतर चितारमध्ये झाले. तेव्हापासून कलावंतांच्या या वस्तीला चितारओळ म्हणून ओळखले जाऊ लागले. चितारओळ ही नागपुरच्या सर्वात प्राचीन वस्तींपैकी एक असली तरी इतिहासाच्या पाऊलखुणा या चितारओळीने जपलेले आहेत. सध्या या चितारओळीत सर्वाधिक मूर्तीकरांचे घर आहेत.
नागपूर या शहराची स्थापना गोंड राजांनी केली असली तरी राजे रघुजी भोसले यांच्या राज्य काळात हे शहर मराठा साम्राज्याचा एक प्रमुख भाग होते. त्यावेळी राज्यांनी या चितारओळीची निर्मिती केली होती. आज या घटनेला ३०० वर्ष पूर्ण झाले असले तरी या चितारओळीने आपले अस्तित्व जपलेले आहे. त्यानंतर ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हा सेंट्रल प्रोविअन्स अँड बेरार म्हणजेच सीपीआर बेरार राज्याची राजधानी म्हणून देखील नागपूर शहराची ओळखले जायचे.
देशभरातील कलावंतांना चितारओळीत वसवले : राजे रघुजी भोसले यांनी भारतातील उत्कृष्ट कारागीर, मूर्तिकार चित्रकार, कास्टकार, शिल्पकार, रंगारी (पेंटर) यांना भारताच्या विविध भागातून नागपुरात आणले होते. त्यांना चिताररोळी येथे स्वतःची घरे बांधून दिली. आज हीच चितारओळी नागपुरातील मूर्तिकारांची वसाहत म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुंदर व उत्तम मूर्ती बनवल्या जातात. त्यात प्रामुख्याने गणपती बाप्पांच्या हजारो मूर्ती निर्मिती दरवर्षी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे राजवाड्यातील गणपती बाप्पांची मूर्ती देखील गेल्या नऊ ते दहा पिढ्यांपासून चितारओळीतच तयार केली जाते. इथे वर्षानुवर्षे मुर्त्या घडविण्याचे काम सुरू आहे. एवढंच नाही तर गणपती आणि मोहरममध्ये माणसाला वाघ म्हणून रंगवण्याची प्रथा आणि परंपरा चितारओळीतुनचं सुरुवात झाली.
चितारओळी झाली मूर्तिकारांची वसाहत : सुरुवातीच्या काळात चित्रकार आणि कलाकारांची वस्ती म्हणून चितारओळी प्रसिद्ध होती. त्यानंतर आता या चितारओळीला
मूर्तीकारांची वस्ती म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला सुमारे ५०० मूर्तिकारांची घरे चितारओळीत होती. मात्र, आता केवळ शंभर मूर्तिकारांचे घर शिल्लक राहिले आहेत. त्यांचा पारंपारिक व्यवसाय या मूर्ती तयार करणे आहे. मात्र, नवीन पिढी या पारंपरिक व्यवसायापासून दूर जात असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात.
हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj : उड्डाणपुलाच्या खांबांवर शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास; पाहा, VIDEO...