ETV Bharat / city

Hedgewar Smriti Bhavan Reiki Case : दहशतवादी रईस अहमद शेखचा काश्मीर ते नागपूर रेकी प्रवास, कोणी केली मदत?

रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी ( Hedgewar Smriti Bhavan) करणारा दहशतवादी रईस अहमद शेख हा कोण आहे?, कुठला राहणारा आहे?, त्याने रेकी कुणासाठी केली? असे अनेक प्रश्न सर्वांनाच प्रश्न पडलेले आहेत.

Hedgewar Smriti Bhavan Reiki Case
रईस अहमद शेखचा कश्मीर ते नागपूर रेकी प्रवास
author img

By

Published : May 19, 2022, 5:29 PM IST

Updated : May 19, 2022, 7:49 PM IST

नागपूर - काश्मीर वरून थेट नागपूरला येऊन रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी ( Hedgewar Smriti Bhavan) करणारा दहशतवादी रईस अहमद शेख हा कोण आहे?, कुठला राहणारा आहे?, त्याने रेकी कुणासाठी केली? असे अनेक प्रश्न सर्वांनाच प्रश्न पडलेले आहेत. दहशतवादी रईस अहमद शेख हा सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात ( Hedgewar Smriti Bhavan Reiki Case ) आहे, सुरक्षेच्या कारणानेच दहशतवादी रईसची अत्यंत गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे.

रईस अहमद शेखकडून अनेक प्रकारची माहिती एटीएसला हवी आहे. त्याच्यावर नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये "अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रीवेंशन ॲक्ट" अन्वये नागपुरात केलेल्या रेकी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी संबंधित गुन्हा एटीएसला हस्तांतरित केल्यानंतर एटीएसने काश्मीरमधून रईस अहमद शेखला प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली आहे. एटीएसचे पथक रईस अहमद शेख नागपुरात कोणा कोणाला भेटला, त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली. नागपुरात त्याला हॉटेलचे बुकिंग तसेच येण्याजाण्याच्या विमानाच्या टिकीट संदर्भात कोणी मदत केली याचा तपास एटीएसचे अधिकारी घेत आहेत.

हेही वाचा - डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

कोण आहे दहशतवादी रईस अहमद शेख - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची रेकी करणारा दहशतवादी रईस अहमद शेख ( वय २६ ) असून तो जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा मधील खाटी मोहल्ला मध्ये राहणारा आहे. रईस अहमद फार शिकलेला नाही. मात्र तो इलेक्ट्रिक कामांमध्ये तरबेज असल्याची माहिती आहे.

रईस जैश-ए- मोहम्मदच्या संपर्का कसा आला - रईस अहमद शेखचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. तो एका मित्राच्या माध्यमातून जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. पैशाची चणचण दूर करण्यासाठी तो जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आल्याचे त्याने तपास यंत्रणांना सांगितल्याची माहिती आहे.

दहशतवादी रईसचा पाकिस्तान दौरा - दहशतवादी रईस अहमद शेख हा जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्यानंतर त्याला त्याच्या पाकिस्तानमधील हँडलर ओमरने पाक व्याप्त काश्मीरमध्ये बोलावून घेतले होते. एप्रिल २०२१ मध्ये रईस पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आल्याची माहिती आहे.

पाकिस्ताननंतर नागपूर दौरा - दहशतवादी रईस अहमद शेख हा पाकव्याप्त काश्मीरमधून परत आल्यानंतर त्याला नागपुरात संघाच्या रेकीसाठी पाठवण्यात आले होते. तो दहशतवादी संघटनेसाठी अगदी नवा रिक्रूट असताना ही त्याला नागपूरमध्ये रेकी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. नागपुरात त्याला फक्त रेकी करायची जबाबदारी देण्यात आली होती.

नागपुरात संघाची केली रेकी - दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख हा 13 जुलै 2021 रोजी विमानाने काश्मीरहून मुंबईला पोहचला होता. त्यानंतर त्याच दिवशी तो विमानाने नागपुरात दाखल झाला. रईसने नागपूरला आल्यानंतर नागपुरातील हस्तकाशी संपर्क साधला असावा असा पोलिसांना दाट संशय आहे. नागपूरला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तो ऑटोरिक्षाने सीताबर्डी भागात पोहचला. सीताबर्डी येथील एका हॉटेलमध्ये त्याने एक खोली बुक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला तो महालमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करायला गेला. मात्र, त्याभागात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याने त्याला रेकी करता आली नव्हती. म्हणून त्यानंतर तो रेशीमबाग मैदानात आला. येथून त्याने तिथे डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची व्हिडिओ शूटिंग करून रेकी केली. त्यानंतर ते व्हिडिओ हँडलर ओमरला पाठवले होते.

अटकेनंतर काय घडले - गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तो काश्मीर पोलिसांच्या हाती लागला. त्याचा जैश-ए-मोहम्मद सोबत संपर्क आहे, अशी माहिती मिळाल्यामुळेच काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या वेळेस ही त्याच्याकडून दोन हॅण्डग्रेनेड सापडले होते. जेव्हा काश्मीर पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने जुलै महिन्यात नागपूरला प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स नेही त्याचा तपास केला आणि नागपूर पोलिसांना जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपूर प्रवास केल्याची माहिती दिली. त्यानंतर नागपूर पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये जाऊन रईस अहमद शेखची चौकशी केली होती. तेव्हा त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबच्या आधारावर नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये "अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रीवेंशन ॲक्ट" अन्वये नागपुरात केलेल्या रेकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - Hedgewar Smriti Bhavan : गेल्यावर्षी दोन दिवस नागपुरात मुक्कामी होता दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख

Last Updated : May 19, 2022, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.