नागपूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( Swatantracha Amrut Mahotsav ) यावर्षी हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga ) हे अभियान उत्साहात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक भारतीयांना आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेचं तिरंगा झेंडा लावायचा आहे. मनात असलेले देशप्रेम व्यक्त करण्याची ही संधी असल्याने तिरंगा झेंडा विकत घेण्यासाठी आता सर्वसामान्य नागरिक दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरातील शुक्रवारी तलाव येथील खादी ग्रामोद्योग भवनात ( khadi gramodyog nagpur ) तर झेंडा विकत घेण्यासाठी ग्राहकांची रिग लागल्याचं चित्र निर्माण झाले आहे.
झेंड्याच्या विक्रीत तब्बल 75 टक्यांची वाढ - अचानकपणे तिरंगा झेंड्याची मागणी वाढल्याने झेंडयांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. उपराजधानी नागपूर शहरामध्ये ( Sub capital Nagpur ) केंद्र सरकारने घालून दिलेले सर्व निकष आणि नियमांसह तयार झेंडा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे खादी ग्रामोद्योग भवन. गेल्या आठ दिवसांपासून ग्राहकांची झेंडा विकत घेण्यासाठी नागपूरकरांची गर्दी इथे वाढली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये झेंड्याच्या विक्रीत तब्बल 75 टक्यांची वाढ झाल्याची माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाचे सचिव एडवोकेट अशोक बनसोड यांनी दिली आहे.
सरकारने घालून दिलेल्या निकषाचे पालन - उपराजधानी नागपूर शहरामध्ये केंद्र सरकारने घालून दिलेले सर्व निकष आणि नियमांसह तयार झेंडा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शुक्रवारी तलाव येथील खादी ग्रामोद्योग भवन असल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागपूरकरांची गर्दी इथे वाढली आहे. दुकानात येणाऱ्या दहा पैकी 9 ग्राहक हे झेंडा खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती खादी ग्रामोद्योगचे अधिकारी सतीश चरडे यांनी दिली आहे.
म्हणून नागरिकांची खादी ग्रामोद्योग निर्मित झेंड्याना पसंती - काही राजकीय पक्षांनी सुद्धा तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिला जात आहेत. मात्र त्यांच्या झेंड्यात अनेक अडचणी आहेत. शिवाय झेंडा निकषांना धरून नसल्याने नागरिकांनी खादी ग्रामोद्योग कडून निर्मिती झेंड्याना पहिली पसंती दिली आहे.
या आकारात आणि दरात झेंडे उपलब्ध - खादी ग्रामोद्योग ( khadi Gramodyog Nagpur ) मध्ये विविध आकारांचे तिरंगा झेंडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये 8X12 या आकाराच्या झेंड्याची किंमत 8500 रुपये इतकी आहे. तर 6X9 आकाराच्या झेंड्यासाठी 6500 रुपये इतके मोजावे लागत आहेत. याशिवाय 4X6 आकाराच्या झेंड्याची किंमत 2200 रुपये इतकी आहे. 3X4.5 आकाराच्या झेंड्याची किंमत 1700 रुपये इतकी आहे. या व्यतिरिक्त सर्वाधिक मागणी आहे ती 2X3 आकाराच्या झेंड्याला आहे. त्याची किंमत 900 रुपये इतकी आहे. तर 18 इंच बाय 27 इंच झेंड्याची किंमत 450 रुपये इतकी आहे,या शिवाय 1X1.5 आकाराच्या झेंड्याचे दर 200 रुपये इतकी आहेत.
हेही वाचा :Har Ghar Tiranga: ITBP महिला सैनिकांनी उत्तराखंडमध्ये 17 हजार फुटांवर फडकवला तिरंगा