नागपूर - नागपूर शहरामध्ये दररोज दोन हजारांवर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहरामध्ये वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने 15 ते 21 मार्च काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराबाहेर न पडता सहकार्य करा, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नागरिकांना केले आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला.
नागपूरकरांनो लॉकडाऊनला सहकार्य करा; पालकमंत्री डॉ. नितीन राऊतांचे आवाहन
लॉकडाऊनला नागरिकांनी, व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, कामगार, डेली वेजेस कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमरावतीत लॉकडाऊनंतर कोरोना बधितांची संख्या घटली आहे. यामुळे या आवाहानाला नागरिकांनी सहकार्य करा. लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.