ETV Bharat / city

ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन होणार; ते पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्र सरकार 3 हजार कोटींचे हायड्रोजन मिशन राबवत आहे. सांडपाणी सोलरच्या सहाय्याने रिसायकल करून ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे आता पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वस्तूंचा उपयोग बंद करायचा आहे, असे गडकरी म्हणाले.

Green Hydrogen Fuel Nitin Gadkari
सांडपाणी रिसायकल प्रकल्प नितीन गडकरी
author img

By

Published : Aug 16, 2021, 1:50 AM IST

नागपूर - केंद्र सरकार 3 हजार कोटींचे हायड्रोजन मिशन राबवत आहे. सांडपाणी सोलरच्या सहाय्याने रिसायकल करून ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे आता पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वस्तूंचा उपयोग बंद करायचा असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन होणार आहे. यासोबत भविष्यात भारत देश हा हायड्रोजन निर्यात करणारा देश बनवायचा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा - ... तर नुकसान महाराष्ट्राचेच, विचार करावा लागेल; गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गडकरी हे नागपुरात माहनगर पालिकेच्या वतीने सांडपाणी रिसायकल करण्याच्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. शंकर नगर येथील गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माहापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नागपूर मनपाने पुढाकार घेऊन शून्य किमतीच्या पाण्याचा उपयोग ग्रीन हायड्रोज निर्माण करण्यासाठी करावा, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन हायड्रोजन तयार करून जगातील पाहिले शहर लोकांच्या सहकार्याने बनवण्याचा माणस गडकरी यांनी बोलून दाखवला.

काय आहे लघू सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प?

नागपूर शहरातील 12 गार्डन नाग नदीच्या काठावर आहेत. या ठिकाणी जपान सरकारच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सांडपाणी रिसायकल करण्याच्या प्रकल्पाला सुरवात करण्यात आली आहे. यात सोलर प्लांटच्या सहाय्याने नाल्यातील 1 लाख लिटर पाण्याचा पूर्णवापर करण्यात येणार आहे. यातून जवळपास 80 हजार लिटर पाणी हे या गार्डन आणि मैदान यांच्या देखरेखीसाठी वापरणार असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. तसेच, उर्वरीत पाणी नवीन बांधकाम करणाऱ्यांना विकून त्यातून आर्थिक स्रोतात भर पडणार असल्याचेही गडकरी म्हणाले.

जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण मुक्त शहर बनले पाहिजे

नागपूर शहरात झाडे लावण्याचा प्रकल्प रखडला असल्याने दरवर्षी 5 लाख झाडे लावण्याची योजना राबवावी. यातून नागपूर शहरात ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण दूर करायचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाल्यातून वाहून जाणारे पाणी स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर होणार आहे. जपान सरकारच्या मदतीने हे होणार आहे. कमी खर्चात पाणी स्वच्छ करून प्रदूषण सुद्धा कमी करण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - Akhand Bharat Sankalp : नागपुरात वंदे मातरमचे सामूहिक गायन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.