ETV Bharat / city

गांधी जयंती निमित्ताने राज्यपाल वर्धा शहरात; बापू कुटीला भेट देणार - भगत सिंह कोश्यारी वर्धा दौरा

महात्मा गांधी जयंती निमित्ताने राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शनिवारी एक दिवसीय दौऱ्यावर वर्धा येथे येणार आहे. यादरम्यान ते सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे.

गांधी जयंती निमित्ताने राज्यपाल वर्धा शहरात; बापू कुटीला भेट देणार

author img

By

Published : Oct 2, 2021, 10:42 AM IST

नागपूर : महात्मा गांधी जयंती निमित्ताने राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शनिवारी एक दिवसीय दौऱ्यावर वर्धा येथे येणार आहे. यादरम्यान ते सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयच्या दीपोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.

दीपोत्सवाचे उद्घाटन

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्या 152 व्या जयंती निमित्ताने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी करतील. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता विश्वविद्यालयाच्या गांधी हिल्स वर आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल विश्वविद्यालयातील कस्तूरबा परिसरात 'गांधींचे दर्शन घेतील. त्यानंतर वैश्विक साम्प्रदायिकतेचे समाधान' या विषयावर आयोजित चर्चा सत्रात भाग घेणार आहेत. चर्चासत्रात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि गोंडवाना विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, चित्रपट अभिनेता नितीश भारद्वाज उपस्थित राहतील. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विदर्भ क्षेत्रातील विद्यापीठाच्या कुलगुरूं, सह अन्य गन्मान्य पाहुण्यांसोबत बैठक घेणार आहेत.

हेही वाचा - ..अन् राज्यपालांनी व्यासपीठावरच हटवला भावेंच्या चेहऱ्यावरचा मास्क

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.