नागपूर - गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याला अखेर नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची अक्षरशः वरात काढली आहे. लोकांच्या मनातील सफेलकरच्या नावाची दहशत कमी व्हावी, या उद्देशाने नागपूर पोलिसांनी याआधीहीा अनेक गुंडांची अशीच वरात काढली होती. दोन खून प्रकरणात रणजीत सफेलकरचा थेट सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. काल रात्री अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
हेही वाचा - नागपुरात शुल्लक कारणावरून दोघांनी केला मित्राचा खून; आरोपी फरार
तपास सीबीआयकडे
२०१६ला झालेल्या एकनाथ निमगडे खून प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे, तर मनीष श्रीवास खून प्रकारचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. येत्या काही दिवसात सफेलकरची सीबीआयच्या कोठडीत रवानगी होणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर नागपूर पुणे शाखा पोलिसांना बहुचर्चित एकनाथ निमगडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात मोठे यश मिळाले आहे.
सफेलकरच्या पळून जाण्याचे सर्व मार्ग केले बंद
निमगडे यांचा खून कुख्यात गुंड रणजीत सभेलकर आणि त्याचा खास सहकारी कालू हाटे यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याआधारे तपास करताना २०१२साली झालेल्या मनीष श्रीवास अपहरण आणि खून प्रकरणातही याच आरोपींचा सहभाग आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी रणजीत सफेलकर या कुख्यात गुंडाचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी रणजीत सफेलकरच्या पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर फास आवळायला सुरुवात केली होती. अखेर काल रात्री पोलिसांनी त्याला नागपूर शहरातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी रणजीत सफेलकरची वरात काढली आहे.
हेही वाचा - १६० किलो गांजासह दिल्लीच्या तस्कराला नागपूर पोलिसांकडून अटक
निमगडे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
२०१६साली निमगडे खून प्रकरण राज्यात गाजले होते. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ज्यावेळी निमगडे फिरायला गेले होते, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळी बार केला होता, ज्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा पोलिसांनी केला. मात्र आरोपी सापडत नसल्याने या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.