ETV Bharat / city

नागपुरात कचरा वेचणाऱ्यांमध्ये राडा; घंटीची हत्या

आरोपी मनोज भोजने हा देखील कचरा वेचण्याचे काम करत होता. दोघांमध्ये वाद झाला असता आरोपीने घंटीच्या डोक्यावर वीट मारून त्याची हत्या केली. मृतक घंटी हा दिवसभर कचरा वेचून मिळणाऱ्या पैश्यातून स्वतःचे पोट भरायचा तर आरोपी मनोज सुद्धा कचरा वेचायचा.

आरोपीला अटक
आरोपीला अटक
author img

By

Published : Oct 5, 2021, 9:17 PM IST

नागपूर -शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपुरा परिसरात एका इसमची हत्या झाली आहे. मृतक हा बेघर असून तो कुंभारपुरा या ठिकाणी कचरा वेचण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला घंटी नावाने ओळखले जायचे. घंटीचा खून मनोज नामक कचरा वेचणाऱ्या इसमाने दारूच्या नशेत केला आहे. पोलिसांनी मनोजला अटक केली आहे.

नागपुरात कचरा वेचणाऱ्यांमध्ये राडा

दारूच्या नशेत हत्या -

आरोपी मनोज भोजने हा देखील कचरा वेचण्याचे काम करत होता. दोघांमध्ये वाद झाला असता आरोपीने घंटीच्या डोक्यावर वीट मारून त्याची हत्या केली. मृतक घंटी हा दिवसभर कचरा वेचून मिळणाऱ्या पैश्यातून स्वतःचे पोट भरायचा तर आरोपी मनोज सुद्धा कचरा वेचायचा. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. रात्री कुंभारपुरा परिसरातील शास्त्री गार्डन जवळ मनोज आणि घंटी यांच्यात वाद झाला. त्यावेळी मनोज हा दारूच्या नशेत होता. दोघांमध्ये सुरू असलेला वाद इतका विकोपाला गेला की मनोज ने दारूच्या नशेत घंटीच्या डोक्यावर सिमेंटच्या विटांचा मारा केला. ज्यामध्ये घंटीच्या जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळाच्या काही अंतरावर झोपला आरोपी -

घटनेची माहिती समाजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाची ओळख पोलिसांनी घंटी म्हणून पटवली. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मनोजचा शोध सुरू केला तेव्हा तो घटनास्थळा पासून काही अंतरावर दारूच्या नशेत लोळत पडलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर दारूची झिंग उतरल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.