नागपूर न्यायालयातील कारवाईनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail नेत असलेल्या मोक्काच्या कैद्याकडे Mokka prisoner possession, गांजा आणि मोबाईलच्या १५ बॅटरी आढळून Ganja and 15 mobile batteries found आल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज कवळेला अटक केली आहे.
आरोपी सुरज कवळेवर दरोडा, चोरी, मारहाण, लूटपाट या सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ मध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच आहे.
फाईल्स मध्ये दडविले होते गांजा व बॅटरी आरोपी सुरजच्या प्रकरणाची, न्यायालयात आज सुनावणी होती. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याला कारागृहात आणण्यात आले. तेव्हा सुरजकडील कागदपत्रांच्या फाईल तपासल्या असता, त्यात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटरी आढळून आल्या. गांजा आणि बॅटरी सहजरीत्या कुणाला सापडणार नाहीत, अश्या पद्धतीने फाईल मध्ये लपवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांनी सुरजची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर धंतोली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.