ETV Bharat / city

नागपुरात अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासह तिघे अटकेत - प्रियकराने केला बलात्कार नागपूर

एका अल्पवयीन विद्यार्थीनीने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने प्रियकराविरुद्धच बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. मात्र त्यानंतर आणखी दोघे या कृत्यात सहभागी असल्याचे पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.

जरीपटका पोलीस ठाणे
जरीपटका पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 27, 2022, 7:24 AM IST

नागपूर - प्रेमसंबंधातुन मित्राने शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याचवेळी प्रियकराच्या दोन मित्रांनी सुद्धा आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका अल्पवयीन विद्यार्थीनीने नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला पीडित तरुणीने प्रियकराविरुद्धच बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. मात्र त्यानंतर आणखी दोघे या कृत्यात सहभागी असल्याचे पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश कांबळे, बिट्टू खोब्रागडे आणि रक्षित खोब्रागडे यांचा समावेश आहे. आरोपी बिट्टू आणि रक्षित हे दोघेही भाऊ आहेत.

रूमवर केला बलात्कार - पीडित तरुणी बुटीबोरी येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती तिच्या मैत्रीणीसह बुटीबोरी येथे रूम करून राहते. यश कांबळे नामक तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. सुमारे आठ दिवसांपूर्वी यशने पीडित तरुणीला त्याच्या रूमवर बोलावले होते. तिथे दोघांमध्ये शाररीक संबंध निर्माण झाले. त्यानंतर बाजूच्या खोलीत लपून असलेल्या आणखी दोघांनी तरुणीवर बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी यश हा पीडित तरुणीच्या खोलीवर गेला. तिच्याकडे त्याने शाररीक संबंधाची मागणी केली. मात्र त्या तरुणीने नकार देतात यश संतापला. रागाच्या भरात त्याने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे पीडित तरुणी देखील चिडली. तिने फोन करून आईला सर्व प्रकार सांगितला. तरुणीची आई तिला घेऊन लागलीचं जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि यश कांबळे विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली

बलात्कारची तक्रार गॅंगरेपमध्ये - पीडित तरुणीने सुरुवातीला तिचा मित्र यश कांबळे विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगाने जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यानंतर तरुणीने तिच्यावर एक नाही तर तिघांनी बलात्कार केल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी ही माहिती जरीपटका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा नव्याने जबाब नोंदवून सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.