ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणेशोत्सवानिमित्त जाणून घेऊया 'विदर्भातील अष्टविनायक मंदिरांची माहिती' - Yawatmal District Ashtavinayaka temples

महाराष्ट्राप्रमाणे, विदर्भात Vidarbha देखील गणपतीची आठ महत्त्वाची मंदिरे Vidarbha Ashtavinayaka temples History आहेत. विदर्भातील गणेशाच्या मंदिरांना विदर्भातील अष्टविनायक Ashtavinayaka temples in Vidarbha असे म्हटले जाते. गणेशोत्सव निमित्ताने आज आम्ही तुम्हाला विदर्भातील अष्टविनायकांची ओळख करून देणार आहोत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण तीन, तर भंडारा जिल्ह्यात दोन मंदिरे आहेत. याशिवाय वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक मंदिर बाप्पाचे असून, या आठ मंदिरांचा समावेश विदर्भातील अष्टविनायकांमध्ये होतो. Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022
विदर्भातील अष्टविनायक मंदिरे
author img

By

Published : Aug 30, 2022, 6:36 PM IST

नागपूर महाराष्ट्राप्रमाणे, विदर्भात Vidarbha देखील गणपतीची आठ महत्त्वाची मंदिरे Vidarbha Ashtavinayaka temples History आहेत. विदर्भातील गणेशाच्या मंदिरांना विदर्भातील अष्टविनायक Ashtavinayaka temples in Vidarbha असे म्हटले जाते. गणेशोत्सव निमित्ताने आज आम्ही तुम्हाला विदर्भातील अष्टविनायकांची ओळख करून देणार आहोत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात Nagpur District Ashtavinayaka temples एकूण तीन, तर भंडारा जिल्ह्यात Bhandara District Ashtavinayaka temples दोन मंदिरे आहेत. याशिवाय वर्धा Wardha District Ashtavinayaka temples, यवतमाळ Yawatmal District Ashtavinayaka temples आणि चंद्रपूर जिल्ह्यात Chandrapur District Ashtavinayaka temples प्रत्येकी एक मंदिर बाप्पाचे असून, या आठ मंदिरांचा समावेश विदर्भातील अष्टविनायकांमध्ये होतो. Ganeshotsav 2022

विदर्भातील अष्टविनायकांच्या माळेत पहिला मान हा नागपूरच्या प्रसिद्ध आदासा येथील शमी विघ्नेशाचा आहे. तर दुसरा गणपती हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंबच्या चिंतामणीचा आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे विराजमान असलेला सिद्धिविनायक, देखील अष्टविनायक आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वतोभद्र बाप्पा, भद्रावती येथे स्थापित असलेला वरदविनायक, भंडारा जिल्ह्यात असलेल्या मेंढा येथील भृशुंड गणपती आणि रामटेकचा अष्टदशभुज गणपती बाप्पा आणि नागपूर येथील सर्वाधिक प्रसिद्ध टेकडी गणपती बाप्पा असे या अष्टविनायक माळेतील मोती आहेत.

आदासा येथील विघ्नेश विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात आदासा एक गाव आहे. हे गाव तेथील गणेशमंदिरामुळे नावाजलेले आहे. एका उंच टेकडीवर पुरातन गणेश मंदिर आहे. ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे, असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे आदासा क्षेत्र. गणेशाच्या २१ स्थानांपैकी हे एक जागृत गणेश स्थान आहे.

कळंबचा चिंतामणी विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर; यवतमाळ नागपूर महामार्गावर असलेल्या, कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर, गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले, तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

केळझरचा सिद्धीविनायक वर्धा नागपूर मार्गावरील केळझर येथील टेकडीवर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हे मंदिर सर्वदूर परिचित आहे. या मंदिराचा फार प्राचीन इतिहास आहे. एवढेच नाही तर हे मंदिर वसिष्ठ ऋषींनी, केवळ त्यांच्या पूजेकरिता निर्माण केल्याची आख्यायिका आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून या केळझरच्या सिद्धिविनायकाची ओळख आहे. शिवाय नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. वसिष्ठ पुराण आणि महाभारतात केळझर या गावाचा उल्लेख एक चक्रनगर या नावाने उल्लेख आहे. श्रीरामचंद्राचे गुरू वसिष्ठ ऋषी यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद आहे. वसिष्ठ ऋषींनी स्वत: भक्‍ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली.

पवनीचा सर्वतोभद्र भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. सुमारे ९० सेंटीमीटर उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक समजला जातो. पवनी हे पुरातन शहर आहे. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे.

भद्रावतीचा वरदविनायक चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे. वरदविनायकाचे हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान म्हणून विदर्भात प्रसिद्ध असून, तो विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिरात गणपतीची साडेपाच ते सहा फूट उंचीची भव्य एकपाषाणी मूर्ती आहे. ही मूर्ती खोल गाभाऱ्यात स्थित आहे. गणपती मंदिराला १६ खांबी भव्य सभामंडप आहे. मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षक देवतेच्या स्वरूपात यक्षांच्या प्रतिमा आहेत. तिथेच उजव्या हाताला चौथ्या पाचव्या शतकातील वाकाटककालीन शैलगृहे असून त्यात विष्णू, वराह, त्रिविक्रम आणि नरसिंह यांची शिल्पे आहेत. खोल गाभारा ओलांडून पायऱ्या उतरल्यानंतरच काळ्या पाषाणातील शेंदूरचर्चित आकर्षक मूर्तीचे दर्शन घडले. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. शेजारील यौवनाश्व मंदिर त्यावरील शिलालेखावरून चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य, याच्या काळात इसवी सन ११०४ मध्ये बांधले गेल्याचे समजते. वरदविनायक मंदिराचा कालखंडही बहुधा तोच असावा. मंदिराचे बांधकाम जरी बाराव्या शतकातले असले, तरी गणपतीची मूर्ती त्याहून प्राचीन असावी असे वाटते.

मेंढाचा भृशुंड भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडाऱ्याहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारूढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधे व मोदक आहे. नेसलेले वस्त्र, जानवे कंबरपट्टापण दिसतो.

रामटेकचा अष्टदशभूज विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला रामटेकचा अठराभुज गणेश हा भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नवसाला पावणारा, अशी श्रद्धा असल्याने गणेशोत्सवादरम्यान अवघ्या विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात. रामटेक येथील एका ब्राह्मणाला दृष्टांत देऊन आपण बाजूच्याच नदीत असल्याची माहिती दिली,व माझी स्थापना करा, असेही सांगितले. त्यानुसार शोध घेण्यात आला असता, अठरा हात असलेली गणेश मूर्ती सापडली. ती स्थापन करण्यात आली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

नागपूरचा टेकडी गणपती नागपूरचे नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचे श्रद्धास्थान असलेल्या, टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे. देशात इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती, असा इतिहास आहे. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी, टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात हे विनायकाचे मंदिर अगदी छोटासे होते. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड असून, शेंदराच्या लेपामुळे आता ते स्पष्टपणे दिसत नाही. Ganeshotsav 2022

हेही वाचा Ganeshotsav 2022 अष्टविनायकातला सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर, जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.