नागपूर नागपुरात एक गणेश भक्त Ganesha devotee असा आहे, की ते हौशी कलाकार Ganesha devotee artists असले तरी गेल्या ३० वर्षांपासून मंडळासाठी निशुल्क गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याचे काम नित्यनेमाने करत आहेत. Ganesha devotee artists शेषराव कोरे असे त्यांचे नाव असून ते गेल्या ३० वर्षांपासून वंजारी नगर येथील गणेश मंडळाची मूर्ती निशुल्क Free Ganpati Bappa Idols घडवतात. यावर्षी ते ११ फुटांची गणेश मूर्ती तयार करत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व सर्वांचे लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन बुधवारी होणार आहे. महाराष्ट्राच्या घराघरात विराजमान होण्यासह सार्वजनिक गणेश मंडळातही बाप्पाची स्थापना होते. सार्वजनिक गणेश मंडळे मूर्तिकरांकडून बाप्पाची मूर्ती तयार करून घेतात. Ganeshotsav 2022 मात्र, नागपूरच्या वंजारी नगर येथील ओम गणेश उत्सव मंडळ गेल्या ३० वर्षांपासून मैदानातच गणपती मूर्ती तयार करते. वंजारी नगर येथे राहणारे शेषराव कोरे हे गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतात. ओम गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे हे ५७ वे वर्ष आहे.
स्वतः मूर्ती तयार करण्याचा निर्धार गणेश मंडळ सुरवातीच्या काळात चितारओळ मधून मूर्तिकारांकडून गणपती मूर्ती तयार करून घ्यायचे. ओम गणेश उत्सव मंडळाचे सदस्य शेषराव कोरे यांनी मूर्ती स्वतःच तयार करण्याचा निर्धार केला. मूर्तिकलेचे कुठलेही शिक्षण न घेतलेल्या कोरे यांनी पहिल्याच वर्षी 4 फूट उंचीची गणेश मूर्ती तयार केली. तेव्हापासून ते स्वतःच्या खर्चाने व मंडळाकडून कुठलेही शुल्क किंवा मानधन न घेता गणपती मूर्ती तयार करतात.
जागेवरचं मूर्ती तयार करतात जिथे बाप्पाची स्थापना होत असते, त्याच जागेवर गणपती मूर्ती तयार करण्यात येते. आता कोरे यांना त्यांचा मुलगा आणि मंडळाचे इतर सदस्य देखील या कार्यात मदत करतात. गेल्या 2 वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लहान मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र आता मूर्तींवरील प्रतिबंध हटल्याने यंदाची मूर्ती ११ फूट उंचीची तयार करण्यात आली आहे. मूर्तिकलेचे कुठलेही प्राथमिक शिक्षण न घेता गणपती मूर्ती तयार करण्यास सुरवात केलेले शेषराव कोरे आज मूर्तिकार बनले आहेत. ते केवळ बाप्पाच्या आशीर्वादाने असे ते सांगत आहेत.