ETV Bharat / city

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मित्रानेच केली मित्राची हत्या; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात - nagpr latest news

दोन्ही मित्रांमध्ये एक महिन्यापूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने साई नगर येथील शेंडामे यांच्या शेताच्या पलीकडील खाली जागेत धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांचा मुलाची हत्या केली.

हत्या
हत्या
author img

By

Published : Sep 2, 2020, 7:56 PM IST

नागपूर - एका अल्पवयीन आरोपीने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई नगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. महत्वाचे म्हणजे आरोपी आणि मृतकाचे वय अवघे सोळा वर्ष असून आरोपीने अत्यंत निर्घृणपणे त्याच्या मित्राची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या हत्ये प्रकरणातील तक्रारदार रफीक खान दिलावर खान यांचा मुलगा आणि त्याच्या मित्राचे एक महिन्यापूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने साई नगर येथील शेंडामे यांच्या शेताच्या पलीकडील खाली जागेत धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांचा मुलाची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी वाडी परिसरात लपून असल्याचे समजताच वाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा - राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री, भाजपचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.