ETV Bharat / city

नागपूर : बसपाच्या नाराज माजी प्रदेशाध्यक्षांचा 150 कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश - नागपूर सुरेश साखरे बातमी

बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी कारवाईच्या नाराजीमुळे 150 कार्यकर्त्यांसोबत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी बसपामध्ये असताना 30 वर्षाच्या कार्यकाळात पक्षात वेगवेगळया पदावर काम केले होते.

suresh sakhare join shivsena
नागपूर : बसपाच्या नाराज माजी प्रदेशाध्यक्षांचा 150 कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Jun 27, 2021, 5:21 PM IST

नागपूर - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी कारवाईच्या नाराजीमुळे 150 कार्यकर्त्यांसोबत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी बसपामध्ये असताना 30 वर्षाच्या कार्यकाळात पक्षात वेगवेगळया पदावर काम केले. अखेर रविवारी शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्त्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

प्रतिक्रिया

हेही वाचा - राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल; तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय - शरद पवार

नाराज साखरेंचा शिवसेनेत प्रवेश -

साखरे यांच्या पक्षप्रवेशानंतर इतर पदाधिकारी तसेच बसपाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला. सुनील साखरे हे बसपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असताना 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या त्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आल्या. पण ऐन निवडणुकीचा निकाल लागण्याच्या काही तासांपूर्वी पराभवाचे खापर फोडून तत्कालीन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी विरसिंग यांनी चुकीची माहिती मायावती यांनी दिली. त्यामुळे मला पक्षातून काढून टाकले असा आरोप साखरे यांनी केला. त्यानंतरही सामान्य कार्यकर्ता बनून राहिलो असताना मायावती यांनी बाजू ऐकून न घेतल्याने नाराज होऊन त्यांनी शिवसनेनेत जाण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला बांधिल असलेला शिवसेना हा ऐकमेव पक्ष असल्याचे सुरेश साखरे यांनी सांगितले.

'आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढेल' -

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सुनील साखरे यांच्या पदाधिकाऱ्यांसह सेनेत प्रवेश देण्यात आला आहे. आगामी निवडणुका पाहता पक्षाची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी माहिती आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी दिली.

हेही वाचा - 'मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन न बोलावल्यास आम्ही पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.