नागपूर - मनसेकडून नागपूरातील सोनेगाव तलाव ( Sonegaon Hanuman Temple ) परिसरातील हनुमान मंदिरात ( Hanuman Chalisa Played By MNS In Nagpur ) भोंगा लावून हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Row ) करण्यात आले. मात्र, यावरून नवा वाद सुरू झाला. ज्या मंदिरात हनुमान चालीस पठन करण्यात आले, त्या हनुमान मंदिराच्या ट्रस्टकडून हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा मंदिर ट्रस्टच्यावतीने देण्यात आला आहे.
मनसेकडून घोषणाबाजी - आम्ही शहरात ३३ ठिकाणी चालीसा पठणाची परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी एका ठिकाणची परवानगी मान्य केली. त्यामुळे हनुमान मंदिर हनुमान चालीसा पठण केले. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशाने भविष्यात आंदोलन सुरु राहील, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते हेमंत गडकरी यांनी दिली.
पोलीस कारवाई करणार? - नागपूरात मनसेने ज्या मंदिरात हनुमान चालीसा पठण केले. तिथली काही अटीशर्तीवर परवानगी पोलीस विभागाकडून देण्यात आली होती. पण ऐनवेळी मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आल्याने मंदिर प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आला. याप्रकरणी मंदिर ट्रस्टने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. तर या प्रकरणी भोंग्याचा आवाजाचे डेसीबल अहवाल मागवला जाणार असून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांनी माध्यमांना दिली.