ETV Bharat / city

एक बंदिवान बापाची यशोगाथा; जुळ्या मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 12 वर्ष फरार - father was absconding twelve year

मुलींच्या शिक्षणासाठी मध्यवर्ती कारागृहातून ( Nagpur Central Jail ) 12 वर्षांपूर्वी पॅरोलवर आलेला कैदी फरार होता. मात्र, आता स्वत: कारागृहात येत धक्का दिला ( father was absconding twelve year )आहे.

श्रद्धा, श्रुती
श्रद्धा, श्रुती
author img

By

Published : Jul 23, 2022, 4:51 PM IST

नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ( Nagpur Central Jail ) 12 वर्षांपूर्वी पॅरोल रजेवर बाहेर पडलेला कैदी अचानक 12 वर्षानंतर कारागृहात परत आला आहे. तब्बल 12 वर्ष फरार असलेल्या या कैद्याचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर देखील तो सापडतं नसल्याने पोलीस देखील हतबल झाले होते. मात्र, त्यानं अचानक कारागृहात परत येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तो इतके वर्ष कुठे लपून होता, असे त्याला विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरामुळे सर्वांचेचं डोळे पाणावले आहेत. मला दोन मुली आहेत, त्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून मी 12 वर्ष फरार ( father was absconding twelve year ) होतो. या काळात मोल मजुरी करून मुलींचे शिक्षण दहाव्या वर्गापर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर मी माझी शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात परतलो असल्याचं उत्तर दिले आहे. एखाध्या सिनेमाला शोभेल अशीच ही घटना समोर आली आहे.

संजय तेजने असे या बापाचे नाव आहे. सुमारे 17 वर्षांपूर्वी नकळत त्यांच्या हातून हत्येचा गुन्हा घडला. सर्वकाही होत्याचं नव्हतं होऊन बसलं. नुकताचं सुरू झालेला संसार देखील उघडवार पडला. त्याचं दरम्यान पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. काही वर्षांनंतर संजय यांना पॅरोल राजा मंजूर झाली. मात्र, त्यानंतर ते कारागृहात परतलेच नाही. या 12 वर्षांच्या काळात त्यांनी लपून आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत केली. त्यांना काय हवं नको यांची तजबीज केली. आपण पकडले जाऊ या भीतीने ते मुलींना भेटत सुद्धा नव्हते. अथवा त्यांच्यासोबत फोन वर सुद्धा बोलायचे नाही. पण, गुमनामीचे आयुष्य जगत ते एका आदर्श बापाचे कर्तव्य निष्ठेने पूर्ण करत राहिले. नुकतेच त्यांच्या दोन्ही मुली दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे यश बघून संजयने पुन्हा कारागृहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा संघर्ष कारागृहातील कैद्यांसाठी आत्मविश्वास वाढवणार आहे.

संजयच्या मुलींचे यश - नुकतेच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात संजयची मुलगी श्रद्धाला 86 तर श्रुतीने 83 टक्के गुण प्राप्त केले आहे. नागपूर कारागृह प्रशासनाने या दोन्ही मुलींचा सत्कार केल्यानंतर संजय तेजने यांनी केलेला जीवन संघर्ष समोर आला आहे

हेही वाचा - Dhol Tasa Tradition: 'तरुणाईच्या उत्साहामुळे ढोल- ताशा उद्योगाला भरभराट, कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.