ETV Bharat / city

Nagpur Railway Station : नागपूरच्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे अजनी स्टेशनवर प्रदर्शन

author img

By

Published : Jul 23, 2022, 5:39 PM IST

नागपूर मध्यवर्ती ( Nagpur Central Jail ) कारागृहातील बंदीवनांनी तयार केलेल्या वस्तुंना (Made By Nagpur Prisoners ) बाजारपेठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने नागपूर गृह आणि मध्य रेल्वेच्या विशेष प्रयत्नाने अजनी रेल्वे स्टेशनवर ( Ajani Railway Station ) बंदीवनांनी तयार केलेले साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Exhibition of Items Made By Nagpur
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे अजनी स्टेशनवर प्रदर्शन

नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील शेकडो बंदिवान लाकडी सुबक वस्तूंसह अनेक प्रकारच्या वस्तू, कापड, शर्ट, सजावटीचे साहित्य तयार करतात. बंदीवनांनी तयार केलेल्या वस्तुंना नागपुरात चांगली मागणी देखील आहे. बंदीवनांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने नागपूर मध्यवर्ती कारागृह आणि मध्य रेल्वेच्या विशेष प्रयत्नाने अजनी रेल्वे स्टेशनवर ( Ajani Railway Station ) बंदीवनांनी तयार केलेले साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नागपूरच्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे अजनी स्टेशनवर प्रदर्शन

एक स्टेशन एक उत्पादन योजना -"आझादी का अमृत महोत्सव" ( Azadi Ka Amrit Mahotsav ) या कार्यक्रमाचे निमित्ताने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन "एक स्टेशन एक उत्पादन योजना" या अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. या अभियानांतर्गत कारागृहातील कैद्यांनी निर्मित वस्तूचे प्रदर्शन (Exhibition of Items Made By Nagpur Prisoners ) तथा विक्री केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक पुर्व विभाग स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णांत पाटील,नागपूर मध्यवर्ती कारागृह अनुपकुमार कुमरे,आणि अजनी रेल्वे स्टेशन मास्तर माधुरी चौधरी उपस्थित होते.

कैद्यांच्या हस्त निर्मिती वस्तुंना विशेष मागणी - "एक स्टेशन एक उत्पादन" योजनेअंतर्गत आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त अजनी रेल्वे स्थानकावर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या हस्तनिर्मित उत्पादनांचा ( Handcrafted products ) प्रचार आणि विक्री करण्यासाठी एक स्टॉल उघडण्यात आला. याठिकाणी लाकडी वस्तू, लोखंडी वस्तू, कापसाचे पत्रे, टॉवेल आणि इतर सजावटीच्या वस्तू यांसारखी हस्तनिर्मित उत्पादने विक्रीसाठी स्टॉलवर ठेवण्यात आली आहेत.

वन स्टेशन-वन प्रॉडक्ट योजना - वन स्टेशन-वन प्रॉडक्ट ही भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्टॉपवरून स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या भागातील रेल्वे स्टेशनला उत्पादनाची जाहिरात आणि विक्री केंद्र बनवण्याची संकल्पना आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट सारख्याच कल्पनेसह, “एक स्टेशन एक उत्पादन” हे इकोसिस्टम सक्षम करण्यावर आणि उत्पन्न, स्थानिक रोजगार, कौशल्ये आणि उपजीविका सुधारण्यासाठी स्थिर विपणन मंच प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करेल. देशांतर्गत उद्योगांना बळकटी देण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “आत्मनिर्भर भारत अभियान” मोहिमेच्या संदर्भात “एक स्टेशन एक उत्पादन” आता अधिक महत्त्व आणि प्रासंगिकता प्राप्त करत आहे.

हेही वाचा : Businessman Commits Suicide In Nagpur : नागपूरमध्ये व्यावसायीकाची आत्महत्या, कार पेटवून सहकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.