ETV Bharat / city

Eknath Shinde : 'त्या' पत्रकार परिषदेत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला- सुधीर मुनगंटीवार - Sudhir Mungantiwar

या शतकातील सर्वात मोठी बेईमानीची पत्रकार परिषद 24 ऑक्टोंबर 2019 रोजी पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद भाजपच्या ( BJP ) पाठीत खंजीर खुपसणारी होती. भाजप शिवसेनेसोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला असा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar ) यांनी शिवसेनेवर केला. सध्या परिस्थिती बोलतांना ते म्हणाले त्याना दिवसा मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसू लागली. त्यामुळे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ( Congress snd NCP ) जाण्याची भूमिका घेतली.

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jun 26, 2022, 5:15 PM IST

Updated : Jun 26, 2022, 8:09 PM IST

नागपूर - या शतकातील सर्वात मोठी बेईमानीची पत्रकार परिषद 24 ऑक्टोंबर 2019 रोजी पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद भाजपच्या ( BJP ) पाठीत खंजीर खुपसणारी होती. भाजप शिवसेनेसोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला असा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar ) यांनी शिवसेनेवर केला. सध्या परिस्थिती बोलतांना ते म्हणाले त्याना दिवसा मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसू लागली. त्यामुळे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ( Congress snd NCP ) जाण्याची भूमिका घेतली.

Eknath Shinde : ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी शिवसेना संपेल - सुधीर मुनगंटीवार

त्या दिवशी शिवसेना संपेल - हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होते की, ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी शिवसेना संपेल अशी आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. आता दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत 2019 मध्ये कोणाच्या नावाने मत मागितले हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे.

नाचता येईना अंगण वाकडे - तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही. भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची झालेली आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. यात निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. पण सरकार सत्तेतून जात असतांना आता यांना आता काश्मिरी पंडित आठवेल, स्वातंत्रवीर सावरकर आठवेल आता एक एक सगळं आठवेल असेही मुंनगंटीवर म्हणालेत.

फूस लावली म्हणणाऱ्याची बौध्दिकता तपासा - सगळे आमदार काही के जी वनला शिकवणारे विद्यार्थी नाही की त्यांना कोणी फूस लावली. की याचा आरोप हा दिल्लीत जात असलेलता देवेन्द्र फडणवीस याच्यावर केले जात आहे. हे सगळे आमदार निवडणून आलेले आहे. हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहे. जिथे कायदे होते. त्यामुळे फूस लावली असे कोणी म्हणत असेल त्या वक्तव्य करणाऱ्यांची बौध्दिकता तपासलीच पाहिजे असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.

रकारची नैतिक जबाबदारी - बंडोखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले यापूर्वी ही कंगना रणावतचा विषय आला तेव्हा सुद्धा केंद्राने सुरक्षा दिली होती. त्यामुळे या बंडखोर आमदारांना जर जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती आयबीकडून केंद्रसरकारला मिळाली असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यां सर्व आमदारांना सुरक्षा पुरवली पाहिजे यात गैर काही नाही असेही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.

मोठे नेते हे धमक्या देत आहे - अनेक मोठे नेते आहेत जे बंडखोर आमदारांना धमक्या देत आहे. त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेतले नाही तरी रोख हा त्यांच्याकडेच असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. आमचा रस्ता वरळीचा माधातून जातो अश्या धमक्या देणे हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या तर देत असेल तर लक्षात ठेवा याची व्याजासकट परतफेड करावी लागेल असाही इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिला आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

हेही वाचा - Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

Last Updated : Jun 26, 2022, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.