नागपूर - नागपूर शहरातील प्रसिद्ध असे एम्प्रेस मॉलवर कर्ज बुडवल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अखेर छापा घेतला आहे. जवळपास 443 कोटीचे कर्ज बुडवल्याचे कारणावरून हा छापा घेतल्याचे ईडीने अधिकृत ट्विट करून माहिती दिली आहे.
प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट
एम्प्रेस मॉल हा नागपुरच्या गांधीसागर तलावाच्या जवळच भागात आहे. हा मॉल मुंबईतील केएसएल इंडस्ट्रीजच्या मालकीचा असून प्रवीण तायल हे त्याचे डायरेक्टर आहे. केएसएल इंडस्ट्रीजने बँक ऑफ इंडिया तसेच आंध्रा बँककडून आणि युको अशा तीन बँकांकडून सुमारे सातशे कोटी रुपये कर्ज घेतले होते. पण कर्जाची परतफेड विहित मुद्दतीत केली नाही. याउलट कर्जाची रक्कम काही शेल कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे ईडीचा तपास यंत्रणेच्या 2016 मध्ये लक्षात आले. त्यानंतर ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करत कलकत्ता येथील अधिकाऱ्यांकडे याचा तपास दिला. प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणजेच (PMLA) पीएमएलए अंतर्गत 487 कोटींच्या बँक फ्रॉड अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
कोर्टाच्या निर्णयानंतर ईडीने घेतला ताबा
यामध्ये 2019 मध्ये अंदाजे 500 कोटीचा घरात असलेला हा मॉल छापा घेण्याची प्रक्रिया केली. पण यात केएसएल इंडस्ट्रीने याला कोर्टात आव्हान दिल्याने प्रक्रिया थांबली होती. पण नुकत्याच कोर्टाने तायाल यांची याचिका रद्द केल्याने ईडीकडून तात्काळ प्रक्रिया राबवत हा मॉल ताब्यात घेतला. त्यासंदर्भात ईडीने ट्विटरवरून जाहीरसुद्धा केले आहे.
यापूर्वी झाली होती कारवाई
एम्प्रेसमॉल याआधीही अनेक कारणांनी वादात राहिलेला आहे. यापूर्वी महानगरपालिकेचे कोट्यवधींचा संपत्ती कर थकीत ठेवल्याबद्दल ही महापालिकेने एम्प्रेस मॉलवर कारवाई केली होती. पुढल्या काळात काय धागेदोरे ईडीच्या तपासात हाती लागतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या मॉल मध्ये अनेक बड्या कंपन्यांचे शोरूम आहे. ते तसेच सुरू राहणार असून याचे भाडेवसुली मात्र पुढील काळात ईडीच्या माध्यमातून किंवा त्यासाठी एजन्सी नेमली जाईल हेसुद्धा पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - कंगना रणौत विरोधात मुंबईत पोलीस तक्रार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी