ETV Bharat / city

नागपुरात ईडीकडून अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे - नागपूर ईडी रेड

ईडीने नागपूर येथील शिवाजीनगर सोबतच सदर आणि न्यू कॉलनी या ठिकाणी देखील दोन घरांवर छापेमारी केली आहे. न्यू कॉलनी येथील समित आयज्याक आणि जाफर नगर येथील जाफर कादरी यांच्या घरावर ईडी कारवाई करत आहे.

ED raids homes
नागपुरातील घरावर ईडीकडून छापे
author img

By

Published : May 25, 2021, 3:30 PM IST

नागपूर - आज सकाळपासूनच नागपुरात तीन ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. सकाळी शिवाजीनगर परिसरातील हरे कृष्णा अपार्टमेंटमध्ये राहणारे व्यावसायिक सागर भटेवारा यांच्या सदनिकेत सर्च केल्यानंतर ईडीच्या पथकाने सदर परिसरातील न्यू कॉलोनीमध्ये राहणारे समित आयज्याक यांच्या बंगल्यातसुद्धा ईडीकडून सर्च करण्यात आला आहे.

ED raids homes
नागपुरातील घरावर ईडीकडून छापे

हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न

समित आयज्याक हे देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय जाफर नगर येथील रहिवासी जाफर कादरी यांच्या घरावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरातील दोन ठिकाणी ईडीचे छापे

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय सागर भाटेवारा यांच्या नागपूर येथील घरावर छापा मारला. नागपूरच्या शिवाजीनगरातील सागर भाटेवर यांना अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून आर्थिक लाभ मिळवला का? याचा तपास ईडी करत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतून १०० कोटी प्रतिमहिना हप्ते वसुली करण्यासाठी टारगेट दिल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने चौकशी करत अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या संबंधित नागपूर, काटोल आणि मुंबईत दहा ठिकाणी २३ एप्रिल रोजी छापेमारी केली होती.

100 कोटी वसुली प्रकरणी छापे -

या कारवाईनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावरच कारवाई करत ईडीने नागपूर येथील शिवाजीनगर सोबतच सदर आणि न्यू कॉलनी या ठिकाणी देखील दोन घरांवर छापेमारी केली आहे. न्यू कॉलनी येथील समित आयज्याक आणि जाफर नगर येथील जाफर कादरी यांच्या घरावर ईडी कारवाई करत आहे. मात्र, अजूनपर्यंत ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या समोर येऊन कुठलीही माहिती दिलेली नाही. फक्त अंदाज व्यक्त केला जात आहे की शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अवती-भवती चौकशीचा फास आवळला जात आहे. त्याच अनुषंगानेच आज ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

हेही वाचा -धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.