ETV Bharat / city

नागपूर: अखेर 'त्या' हात पाय नसलेल्या मृतदेहाची ओळख पटली - गणेशपेठ पोलीस ठाणे नागपूर

नागपूर शहरातील गांधीसागर तलावात जून महिन्यात हात पाय नसलेले मानवी धड पोत्यात आढळून आले होते. या धडाची ओळख पटवण्यात गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.

मृत व्यक्ती
author img

By

Published : Aug 8, 2019, 8:09 AM IST

Updated : Aug 8, 2019, 10:10 AM IST

नागपूर - शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीसागर तलावात १० जूनला हात पाय नसलेले मानवी धड पोत्यात आढळून आले होते. या धडाची ओळख पटवण्यात गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखेला यश आले आहे. हे धड सुधाकर रंगारी (रा. जरीपटका परिसर, नागपूर) या व्यक्तीचे असून तो शहरात ई-रिक्षा चालवायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीसागर तलावात १० जूनला हात पाय नसलेले मानवी धड पोत्यात आढळून आले होते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ जुलैला त्या धडाचे हात आणि पाय आणि मुंडके भरुन असलेले दुसरे पोते त्याच तलावात सापडले. या घटनेचा तपास करताना गणेशपेठ पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन होते. मृतदेहाचे तुकडे असलेली २ पोती आढळल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटले तरी मृतदेहाची ओळख पटत नसल्याने या घटनेचा तपास गुन्हेशाखेकडे सोपवण्यात आला होता.

गणेशपेठ पोलीस आणि गुन्हेशाखा पोलीस या घटनेचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी संगणक तज्ञांची मदत घेतली. यानंतर त्यांनी मृतदेहाशी मिळता-जुळता चेहरा असलेला फोटो सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करुन घेतला आणि तो फोटो पोलिसांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला. मात्र, पोलिसांना या मृतदेहाचा ओळख पटवण्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी आपले खबरी नागपूर शहराच्या विविध परिसरात ऍक्टिव्ह केले, त्यापैकी एकाने फोटोशी मिळता-जुळता व्यक्ती हा जरीपटका परिसरात राहत असून तो अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुधाकरचे घर गाठले. मृतदेहाचा फोटो दाखवताच त्याच्या कुटुंबातील लोकांनी मृतदेह हा सुधाकरचा असल्याची ओळख पटवली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सुधाकरची हत्या कोणी आणि कशासाठी केली. या संदर्भात तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना सुधाकर बेपत्ता झाले त्यावेळचे मोबाईल लोकसेशनसह त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. यावेळी त्यांना सुधाकर हा घटनेच्या दिवशी भोतमांगे यांच्याबरोबर असल्याचे फुटेज हाती लागले. पोलिसांनी भोतमांगेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. या कामात त्याचा मित्र राहुल धापोडकर सह अन्य एका मित्राची मदत घेतल्याचे सांगितले.

आरोपींनी सुधाकरची हत्या करण्यापूर्वी सोबत दारू पिली. त्यानंतर सुधाकर पुन्हा भोतमांगे याला शिवीगाळ करुन मारहाण करू लागला. आधीच सुधाकर बद्दल राग मनात असल्याने भोतमांगेने बियरची बाटली फोडून सुधाकरची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रेल्वे लाईनवर फेकून एकादी रेल्वे गाडी त्या मृतदेहावरुन गेल्यास अपघात झाला असावा, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आरोपींचा बेत होता. पण बराच वेळ एकही गाडी न आल्याने आरोपींनी सुधाकरचा मृतदेह भोतमांगेच्या खोलीवर आणून इलेक्ट्रिकल कटर मशीनच्या मदतीने त्या मृतदेहाचे ७ तुकडे करुन ते २ पोत्यात भरुन गांधीसागर तलावात फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपासी पथकाला ८० हजाराचे बक्षीस जाहीर केल

Intro:हात पाय नसलेल्या त्या धडाची ओळख पटवण्यात गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे...नागपूरच्या जरीपटका परिसरात राहणार सुधाकर रंगारी अशी मृतक शरीराची ओळख झाली आहे...किरकोळ वादातून ई रिक्षा चालक सुधाकर ची हत्या झाल्याचं निष्पन्न झाली असून त्याच्या हत्येच्या आरोपाखाली ई रिक्षा चालका राहुल भोतमांगे सह दोघांना अटक केली आहे...मृतक सुधाकर हा आरोपी राहुलचा पदोपदी चार- चौघात अपमानीत करायचा त्याचा राग मनात धरून आरोपींनी सुधाकरचा काटा काढल्याचा खुलासा झालाय...Body:गेल्या महिन्याच्या 10 तारखेला नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधीसागर तलावात हात पाय नसलेले मानवी धड पोत्यात आढळून आले होते....त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जुलै रोजी त्या धडाचे हात आणि पाय आणि मुंडके भरून असलेले दुसरे पोते त्याच तलावात सापडले होते....या घटनेचा तपास करताना गणेशपेठ पोलिसांसमोर मृतकाची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन होते...मृतदेहाचे तुकडे असलेले दोन पोते आढळल्याच्या घटनेला अनेक दिवस लोटून देखील मृतदेहाची ओळख पटत नसल्याने या घटनेचा तपास गुन्हेशाखे कडे सोपवण्यात आला होता....गणेशपेठ पोलीस आणि गुन्हेशाखा पोलीस या घटनेचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी कॉम्पुटर एक्सपर्टची मदत घेतली....मृतदेहाशी मिळता- जुळता चेहरा असलेला फोटो सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करून घेतला,आणि तो फोटो पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यानंतर काहींनी पोलिसांनी अप्रोच केलं मात्र मृतकाची ओळख पटेल असे ठोस काहीही मिळत नसल्याने पोलिसांनी अखेर आपले खबरी नागपूर शहराच्या विविध परिसरात ऍक्टिव्ह केले,त्या पैकी एकाने फोटो शी मिळता-जुळता व्यक्ती हा जरीपटका परिसरात राहत असून तो अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली...या गुंतागुंतीची प्रजारणात पोलिसांना मिळालेला हा पहिला धागा होता...पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे सुधाकर रंगारी यांचे घर गाठले....मृतदेहाचा फोटो दाखवताच त्याच्या कुटुंबातील लोकांनी मृतदेह हा सुधाकर रंगारी यांचा असल्याची ओळख पटवली.....मृतदेहाची ओळख सुधाकर रंगारी अशी पटल्यानंतर पोलिसांच्या समोर सर्वात मोठा विषय हा होता की सुधाकर ही हत्या कोणी आणि कश्या साठी केली असावी..या संदर्भात तपास सुरू झाल्यानंतर पोलिसां सुधाकर बेपत्ता झाले त्यावेळचे मोबाईल लोकसेशन सह त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासायला सुरवात केली असता राहुल भोतमांगे नावाच्या दुसऱ्या ई रिक्षा चालकाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले...त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असता त्याने पोलीसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांसमोर त्याची हुशारी कमी आली नाही....पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी राहुल भोतमांगे यांनी सुधाकर ची हत्या केल्याची कबुली दिली,या कामात त्याचा मित्र राहुल धापोडकर सह अन्य एका मित्राची मदत घेतल्याचे सांगीतले.... मृतक हा पदोपदी अपमानीत करत असल्याने त्याचा काटा काढल्याचे काबुल करताना मृतदेहाची विल्हेवाट कश्या प्रकारे लावली हे ऐकताना पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहिला होता...आरोपींनी सुधाकरची हत्या करण्यापूर्वी सोबत दारू ढोसली,त्यानंतर सुधाकर पुन्हा राहुल भोतमांगे याला शिवीगाळ करून मारहाण करू लागला, आधीच सुधाकर बद्दल राग मनात असल्याने राहुल ने बियरची बाटली फोडून सुधाकरची हत्या केली,त्यानंतर मृतदेह रेल्वे लाईनवर फेकून एकादी रेल्वे गाडी त्या मृतदेहावरून गेल्यास अपघात झाला असावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आरोपींचा बेत होता,पण बराच वेळ एकही गाडी न आल्याने आरोपींनी सुधाकरचा मृतदेह राहुलच्या खोलीवर आणून त्या इलेक्ट्रिकल कटर मशीनच्या मदतीने त्या मृतदेहाचे 7 तुकडे करून ते दोन पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकल्याची कबुली दिली आहे....पोलिसांच्या तापसासमोर आरोपीं हुशारी फार काळ टिकली नाही ...या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दाखवलेलं कौशल्या मुळे गवताच्या पेंडीतून सुई शोधून काढण्यासारख्या प्रकरणाचा उलगला झाला आहे,त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तापसी पथकाला 80 हजाराचे बक्षीस जाहीर केलेले आहे

बाईट - निलेश भरणे - अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) Conclusion:
Last Updated : Aug 8, 2019, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.