ETV Bharat / city

Device Will Alert While Driving : वाहन चालवताना ड्रायव्हरला डुलकी लागण्यापासून रोखणारे डिव्हाइस

रस्त्यावर वाहन चालवताना झोपेच्या डुलकी लागून होणाऱ्या अपघातापासून रोखण्यासाठी नागपुरातील एक युवकाने खास डिव्हाईस तयार केले आहे. (A device alerts driver falling asleep) या डिव्हाइस ड्रायव्हरसह प्रवाशांनाही सतर्क करतो. गौरव सव्वालाखे या हा डिव्हाइस बनवला आहे. दरम्यान, गौरवने याबाबतचा अनुभव ईटीव्ही भारतवर सांगितला आहे.

वाहन चालवताना ड्रायव्हरला डुलकी लागण्यापासून रोखणारे डिव्हाइस

author img

By

Published : Feb 22, 2022, 1:16 PM IST

नागपूर - रस्त्यावर वाहन चालवताना झोपेच्या डुलकी लागून होणाऱ्या अपघातापासून रोखण्यासाठी नागपुरातील एक युवकाने खास डिव्हाईस तयार केले आहे. (Device Will Alert While Driving) या डिव्हाइस ड्रायव्हरसह प्रवाशांनाही सतर्क करतो. गौरव सव्वालाखे या हा डिव्हाइस बनवला आहे. दरम्यान, गौरवने याबाबतचा अनुभव ईटीव्ही भारतवर सांगितला आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी बातचीत केली आहे.

गौरव सव्वालाखेने याबाबतचा अनुभव ईटीव्ही भारतवर सांगितला आहे.

अपघातानंतर ही कल्पना सुचली

हे सेन्सर, ३.६ व्होल्ट बॅटरीसह येते. या डिव्हाइसमध्ये ऑन-ऑफ स्विच आहे. जेव्हा ड्रायव्हरचे डोके स्टीयरिंग व्हीलच्या दिशेने ३० अंश झुकलेले असते, तेव्हा अलार्म डिव्हाइस कंपन करू लागेल आणि तुम्हाला सतर्क करेल. ( Fall Asleep While Driving ) जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले डोके ३० अंशाच्या कोनात झुकते आणि डिव्हाइस सक्रिय होते. गौरवने सांगितले की, एकदा झोपेमुळे कारला अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झालो होतो. त्यानंतर गाडी चालवताना झोप लागल्यावर अलर्ट करण्यासाठी एक उपकरण डिझाइन करण्याची कल्पना सुचली.

ड्रायव्हरला डुलकी लागण्यापासून रोखणारे डिव्हाइस

जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल

लक्झरी कारमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक हायटेक उपकरणे आहेत. वाहनाभोवती बसवलेल्या सेन्सर्सवरून आजूबाजूच्या गोष्टींची कल्पना घेऊन कारचा वेग मर्यादित करते. परंतु सामान्य गाड्यांमध्ये असे कोणतेही उपकरण नाही. जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल आणि अपघात होत असताना वाहनाचा वेग कमी करेल. मात्र, गौरव सावलाखे यांचे हे उपकरण सर्वसामान्य वाहनांना अपघातांपासून वाचवू शकते. गौरवच्या म्हणण्यानुसार, गाडी चालवताना हे उपकरण कानाच्या मागे ठेवावे लागते.

यापासून नक्कीच झोपेमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होऊ शकेल

गौरव सव्वालाखे हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून नव नवीन कल्पनेतुन असे डिव्हाइस बनवण्याचा त्याचा छंद आहे. दुरच्या प्रवासात जाताना लागणाऱ्या डुलकीवरुन त्याला ही कल्पाना सुचली असे त्याने सांगितले. त्याने कानावर हेडफोन सारखे असणारे डिव्हाईस तयार केले. या डिव्हाइसमुळे जर का वाहन चालकाचे मान वाकून डोके स्टेरिंगच्या दिशेने 30 डिग्री पेक्षा अधिक झुकले तर त्या डिव्हाईसमधील बीप वाजायला सुरवात होते. त्यामुळे लगेच अलर्ट मिळतो. त्यामुळे यापासून नक्कीच झोपेमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होऊ शकते.

11 हजार 569 लोकांचा बळी रस्ते अपघातात गेला

महाराष्ट्रात दर वर्षी साधारण तीस हजाराच्या घरात अपघात होतात. या अपघातात हजारो लोकांचा जीव गमावतात. यातील बहुतांश अपघात हे मध्यरात्री ते पहाटे दरम्यान होत असल्याचा अनेक अभ्यासकांच्या निष्कर्षांत पुढे आले आहे. महाराष्ट्रात 2020 मध्ये 24 हजार 971 अपघात झाले आहे. यासोबत 11 हजार 569 लोकांचा बळी रस्ते अपघातात गेला आहे. तसेच 2021 मध्ये 29 हजार 291 अपघात झाले आहे. 13 हजार 346 जणांचा अपघात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

डिव्हाईसची मुळ संकल्पना

हा डिव्हाईस कानाला हेडफोन प्रमाणे लावला जात असून यात अलार्म बीप फिट करण्यात आली आहे. यात लावलेले एक सेंसर हे वाहन चालकाचे डोके हे 30 डिग्रीपेक्षा जास्त स्टेअरिंगकडे झुकले तरी वाजायला सुरवात होते. या बीपचा आवाज हा साधारण 80 डेसीबल इतका आहे. त्यामुळे या डिव्हाईसचा आवाजामुळे चालकासह इतर प्रवाशांनाही लक्षात येणार असून त्याचा फायदा त्या चालकाला वाहन चालवण्यापासून रोखल्यास अपघात टाळण्यासाठी होईल अशी खास व्यवस्था आहे.

डिव्हाईसची निर्मिती पूर्ण झाल्यावर 'स्टार्ट अप' करण्याचा मानस

या डिव्हाईसवर सध्या गौरवचे आणखी संशोधन सुरू आहे. त्यामुळे हे डिव्हाइसमुळे एकदा पूर्ण तयार झाल्यास त्याचे उत्पादन करून बाजारात विक्रीसाठी स्टार्टअप करण्याचा गौरवचा मानस आहे. यापूर्वी त्याच्या चिकित्सक स्वभावातून काही डिव्हाईसची निर्मिती झाली आहे. मागील काळात त्याने जीपीएस ट्रॅकिंग आयडी कार्ड, अँटी रेडिएशन मोबाईल चिप, अंध लोकांसाठी स्मार्ट काठी, मोबाईल कंट्रोल हेलिकॉप्टर असे डिव्हाईस त्याने तयार केले आहे. यात अँटी रेडिएशन किट नंतर अँटी स्लिप अलार्म आता नव्याने हा डिव्हाईस लोकांचे जीव वाचवणारा आहे. दरम्यान, या नवीन डिव्हाईस संशोधनामुळे याचा फायदा लोकांचे अपघात रोखून जीव वाचवण्यासाठी होणार असेल. गौरवच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हेही वाचा - ST Merger Report : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण अहवालावर सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.