नागपूर - गेल्या वर्षी नागपूर विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा पराभव पाहिल्यानंतर यंदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Active in Nagpur elections ) सक्रिय झाले आहेत. बॅकफूटवर भाजपला आगामी निवडणुकांसाठी सज्ज करण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा ( Devendra Fadnavis meeting with BJP leaders ) झपाटा सुरू केला आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये पराभवाला समोर जावे लागले आहे. नागपूर पदवीधर निवडणूक असो की जिल्हा परिषद आणि कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपला दारुण पराभवाची नामुष्की पचवावी लागली आहे. पुढच्या काळात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे, त्याच बरोबर हिंगणा आणि कुही नगर पंचायतींच्या निवडणुकीदेखील होणार आहेत.
हेही वाचा-Devendra Fadnavis : आजही 'त्या' शपथविधीचा पश्चाताप होतो - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
मागील निवडणुकीत मिळालेला पराभवाच्या छायेतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप संघटनेच्या बैठकांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस हे स्वतःहा बैठकीत उपस्थित राहिले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हेही वाचा-विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याने नागपूर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज
फडणवीसांचे विदर्भावर लक्ष केंद्रित
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण विदर्भ भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपला विदर्भामध्ये अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. पुढील काळात महानगरपालिकासह अनेक निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, बुलढाणा व वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ग्रामीण, गोंदिया व भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठका घेतल्या आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना केल्या आहेत.
हेही वाचा-MLC Election 2021 : विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध, तर दोन जागांवर होणार लढत