नागपूर - राज्यात हिंगणघाट, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी महिलांच्या बाबतीत घडत असलेले गुन्हे गंभीर बाब आहे. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये तपास आणि आरोप पत्र लवकर दाखल झाले पाहिजे. आरोपीना शिक्षा वेगाने झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. माटुंग्यातील घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले ही गंभीर घटना आहे. जर तक्रार नाही म्हणून आरोपीला सोडले असेल तर कारवाई झाली पाहिजे.
हेही वाचा - औरंगाबाद जळीतकांड : शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ फेब्रुवारीला घडली होती. या घटनेत पीडित तरुणी २८ टक्के भाजली असून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात सुध्दा एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. या नंतर तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण