ETV Bharat / city

Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..' - Devendra Fadnavis On Achalpur Violence

राज्य सरकारने काल राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ( Maharashtra IPS Officers Transferred ) केल्या. मात्र १२ तासांच्या आत यातील काही बदल्या रद्द करण्यात आल्या ( Maharashtra IPS Transfer Promotion Cancelled ) आहेत. या बदल्या रद्द करण्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संशय व्यक्त केला ( Devendra Fadnavis IPS Transfer Promotion Cancelled ) आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 21, 2022, 3:26 PM IST

Updated : Apr 21, 2022, 7:55 PM IST

नागपूर : काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले ( Maharashtra IPS Officers Transferred ) होते. मात्र हा आदेश जारी होण्याच्या अवघ्या बारा तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या ( Maharashtra IPS Transfer Promotion Cancelled ) आहेत. बदल्यांचे आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? ही प्रशासकीय चूक आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ( Devendra Fadnavis IPS Transfer Promotion Cancelled )आहे.

तो वसुलीचा भाग असल्याचं समोर आलं : याआधी सुद्धा राज्यातील दहा आयपीएस (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यानंतर त्या बदल्यात रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बदली घोटाळ्याची चौकशी सुरू ( Police Transfer Fraud Case ) असून, त्याला आर्थिक घोटाळ्याची किनार लागली आहे. तो वसुलीचा भाग असल्याचं देखील तपासात समोर आलं होतं. त्यामुळे हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याने या मागील नेमकं कारण काय आहे? याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'

संजय राऊतांना सद्बुद्धी येईल : गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर येत ( Sanjay Raut Nagpur Visit ) आहेत. संजय राऊत यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात देण्यासाठी नागपुरवर लक्ष केंद्रित केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, नागपूरच्या मातीत आणि वातावरणात वेगळेपण आहे. संजय राऊत यांनी वारंवार नागपूरचा दौरा केल्यास त्यांना सद्बुद्धी ( Devendra Fadnavis Criticized Sanjay Raut ) येईल. देवेंद्र फडणवीस आज नागपूर विमानतळावर बोलत होते.

कितीही हल्ले केले तरी पोलखोल कार्यक्रम सुरूच राहणार : महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi ) कारभाराची पोलखोल आम्ही रोज करतो आहे. ज्यांची पोलखोल होत आहेत त्यांच्या मनात अस्वस्थता पसरली आहे. त्यातून ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही पोलखोल कार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याची माहिती देवेंद्र फडणीस यांनी दिली ( BJP Polkhol Karyakram ) आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी संरक्षण दिले तर आम्ही पोलिसांची सुद्धा पोलखोल करू, असेही ते म्हणाले आहेत.

अमरावतीत इंग्रजांसारखं काम : इंग्रजांच्या राज्यात जसं काम चालायचं तसं काम पोलिसांचे अमरावती जिल्ह्यात सुरू असल्याचा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली ( Devendra Fadnavis Criticized Amaravati Police ) आहे. सरकारचे मंत्री लांगूलचालन करत आहेत. त्यातून परिस्थिती अधिक वाईट होत आहे. त्यामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहत आहेत. याला पोलीस आणि सरकारची भूमिका जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात सातत्याने हिंदू समाजाला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेचं तणाव वाढत असल्याचं ते म्हणाले ( Devendra Fadnavis On Achalpur Violence ) आहेत.

हेही वाचा : गृहखात्याचा अजब कारभार! अवघ्या बारा तासात पाच अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढत्यांना स्थगिती

Last Updated : Apr 21, 2022, 7:55 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.