ETV Bharat / city

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरींची नागपूर विमानतळावर भेट, गडकरींनी दिल्या शुभेच्छा

author img

By

Published : Jul 7, 2022, 7:51 AM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Devendra Fadnavis meet Nitin Gadkari at Nagpur airport ) यांची काल नागपूर विमानतळावर भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी गडकरींचा आशीर्वाद घेतला. गडकरींनी देखील फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस नागपूरला आले असता नितीन गडकरी हे दिल्लीत होते, त्यामुळे या दोन नेत्यांची भेट होऊ शकली नव्हती.

Devendra Fadnavis meet Nitin Gadkari at nagpur airport
देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची भेट

नागपूर - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आशीर्वाद घेतला. फडणवीस नागपूरला आले असता नितीन गडकरी हे दिल्लीत होते, त्यामुळे या दोन नेत्यांची भेट होऊ शकली नव्हती. मात्र, काल दुपारी देवेंद्र फडणवीस मुंबईला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर दाखल झाले असता त्याचवेळी नितीन गडकरी हे देखील दिल्लीवरून नागपूरला आले असता दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांचा आशीर्वाद घेतला, तर गडकरी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - Mumbai Disaster Management : 'मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी आमची नजर'; मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा पद्धतीने करते काम

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. भव्यदिव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले. काल हजारो सर्व सामान्य नागरिकांपासून तर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते. मुंबईला परत जाताना त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली, यावेळी त्यांनी गडकरींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोन्ही नेते आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले.

संघाच्या स्मृती मंदिराला भेट - नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या ( Devendra Fadnavis visited RSS Smriti Mandir ) दौऱ्यावर आहेत. नागपूरला येताच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis in nagpur ) येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच नागपूर दौरा आहे. नागपूरकरांनी फडणवीस यांचे दणक्यात स्वागत केले. त्यानंतर फडणवीस थेट रेशीमबाग येथील प्रेरणास्थळी दाखल झाले होते.

राज्यात शिंदे भाजपचे सरकार, फडणवीस उपमुख्यमंत्री - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader Eknath Shinde ) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ( BJP leader Devendra Fadnavis ) यांनी सरकार स्थापन करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आणि सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठरावही जिंकला. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मात्र सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार काही काळासाठी अडवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला पुढील आठवड्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Gold Silver Rates : चांदीच्या भावात मोठी घसरण.. सोन्याचीही किंमत झाली कमी.. जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.