ETV Bharat / city

लॉकडाऊनंतर व्यायामासाठी सायकलचा वापर, प्रत्येक दुकानातून दिवसाला २५ ते ३० सायकलची विक्री - unlock nagpur

कोरोनाच्या काळात सुदृढ राहण्यासाठी डॉक्टर, तज्ज्ञांकडून विविध आरोग्यविषयक सल्ले दिले जात आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविले जात आहेत. व्यायामासाठी गार्डनमध्ये जाण्यापेक्षा नागरिक कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सायकल वापरण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम सायकल विक्रीवर झालेला पाहायला मिळत आहे.

नागपूर लेटेस्ट न्यूज  नागपूर सायकल मागणी  अनलॉक नागपूर  nagpur cycle demand  nagpur latest news  unlock nagpur  व्यायामासाठी सायकलचा वापर नागपूर
लॉकडाऊनंतर व्यायामासाठी सायकलचा वापर
author img

By

Published : Jul 8, 2020, 7:29 PM IST

नागपूर - देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे घरात असलेले सर्वसामान्य नागरिक आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत, तर दुसरीकडे तीन महिने घरातच कोंडून राहिल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. तसेच काहींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नागरिक कुठल्याही गाडीचा वापर न करता थेट सायकलाचा प्रवास करणे पसंत करत आहेत. त्यामुळे सायकलची मागणी प्रचंड वाढली आहे.

लॉकडाऊनंतर व्यायामासाठी सायकलचा वापर, प्रत्येक दुकानातून दिवसाला २५ ते ३० सायकलची विक्री

कोरोनाच्या काळात सुदृढ राहण्यासाठी डॉक्टर, तज्ज्ञांकडून विविध आरोग्यविषयक सल्ले दिले जात आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविले जात आहेत. व्यायामासाठी गार्डनमध्ये जाण्यापेक्षा नागरिक कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सायकल वापरण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम सायकल विक्रीवर झालेला पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनपूर्वी प्रत्येकी एका विक्रेत्यांकडून दिवसाला १५-१६ सायकल विक्री व्हायच्या. आता त्यात बदल होऊन हा आकडा २५ पर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर सायकलच्या किंमतीत देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, सायकलची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. २ हजारापासून ते १५ हजारांपर्यत किंमतीच्या सायकली सध्या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. यात विविध प्रकारच्या सायकली पाहायला मिळत आहे. अशावेळी नागरिकांकडून पसंतीनुसार सायकल खरेदी केली जात आहे.

ऐरवी आपल्या पाल्यांसाठी सायकल खरेदी करणारे आता मात्र स्वतःसाठी खरेदी करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर तरुण वर्गाचा कल देखील सायकलींगकडे वाढला असल्याचे सायकल विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. इतरवेळी सायकलची विक्री ही शाळा सुरू होण्याच्या काळातच व्हायची. मात्र, आता अनलॉक झाल्यापासून सायकल खरेदीला ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता सायकलींग असेच सुरू राहिले तर आरोग्यबरोबरच प्रदूषणालाही आळा घालणे शक्य होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.