ETV Bharat / city

Drugs Seized Nagpur : २५ लाख किमतीचे २५० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त; तिघांना अटक - २५० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त नागपूर

गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने नागपुरात तब्बल २५० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त ( 250 grams of MD drugs seized Nagpur ) केले आहे. या ड्रग्सची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स नागपुरातुन जप्त करण्यात आलेले नाही.

गुन्हे शाखा नागपूर
गुन्हे शाखा नागपूर
author img

By

Published : Jul 11, 2022, 9:15 PM IST

Updated : Jul 11, 2022, 9:23 PM IST

नागपूर - नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने तब्बल २५० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त ( 250 grams of MD drugs seized Nagpur ) केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स नागपुरातुन जप्त करण्यात आलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती समजली होती की नागपुरात एमडी ड्रग्स पावडरची तस्करी केली जाणार आहे. या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. एका पथकाला खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात करण्यात आले. खबऱ्याने माहिती दिलेले आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीचे उत्तर देत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कारची झडती घेतील असता त्यामध्ये २५० ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इब्राहिम खान अकबर खान, फारुख शेख महमूद आणि वहिदा खान रिझवान खान, असे आरोपींचे नाव आहे.

तडीपार आरोपीला अटक - नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केलेल्या इब्राहीम खान अकबर खानवर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - Sextortion Case : सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा वापर; अधिकाऱ्याला मागितली एक कोटीची खंडणी, २८ लाख घेताना आरोपी रंगेहात पकडला

Last Updated : Jul 11, 2022, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.