नागपूर - शहर आणि जिल्ह्यात मिळून शनिवारी 3827 कोरोनाबधितांची भर पडली आहे. तब्बल 32 दिवसांनी कोरोना बाधितांची नोंद 4 हजाराच्या खाली आली आहे. मागील 9 दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असतांना कोरोनाची लाट ओसरत असल्याचे अहवालातून पुढे येत आहे.
शनिवारी 81 जण दगावले , सक्रिय रुग्णसंख्येत घट
शनिवारी नागपूर जिल्ह्यात 20 हजार 235 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 3827 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 2016 तर ग्रामीण भागातील 1979 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 81 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 51, ग्रामीण भागात 16 तर जिल्हाबाहेरील 14 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच शनिवारी 7 हजार 799 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत 9 व्या दिवशी घट होऊन 58 हजार 245 वर पोहोचली आहे. यामुळे मागील 9 दिवसात दिवसांत 18 हजारच्या घरात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पूर्व विदर्भात 11 हजार 819 जण झाले कोरोनामुक्त
आलेल्या अहवालात पूर्व विदर्भात 11 हजार 819 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 7 हजार 96 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 146 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 4726 हजार अधिक रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात मृत्यूची संख्या पाहता अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही, यामुळे प्रशासनाने मृत्युदर कमी करण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.