ETV Bharat / city

5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीला 20 एप्रिलपासून सुरुवात - डॉ संदीप मोगरे

पुणे येथील जेनोव्हा बायो फार्मासिटिकल्सने आतापर्यंत मानवी चाचण्यांचा दोन तृतीयांश टप्पा पूर्ण झालेला आहे. ट्रायच्या फेज 1 व फेज 2 चाचण्यांमध्ये चार हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. आता कंपनीला पाच ते अठरा वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या चाचणीला डीसीजीआय तर्फे मंजुरी मिळाली आहे.

डॉ संदीप मोगरे
डॉ संदीप मोगरे
author img

By

Published : Apr 17, 2022, 12:38 PM IST

नागपूर - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सध्या आपल्या देशात कोवीशिल्ड आणि कोवॅक्सीन सारखी प्रभावी लस उपलब्ध झाली आहे. यामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र 18 वर्षाखालील मुलांना सुरक्षित करण्यासाठी भारताची पहिल्या स्वदेशी एमआरएनए (MRNA) कडून लसीच्या चाचणीला सुरुवात होत आहे. MRNA कोवीड पुणे येथील जेनोव्हा बायॉफार्मासिटिकलने विकसित केली असून त्याच्या 2/3 चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची परवानगी भारतीय औषध नियमकांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार 20 एप्रिल पासून नागपूर येथील मेडीट्रीना हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये 20 मुलांना mRNA कोवीड लसीचा पहिला डोस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ संदीप मोगरे यांनी दिली आहे.

5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीला 20 एप्रिलपासून सुरुवात

भारतात निर्मित पहिल्या एमआरएनए आधारित "जेमकोवॅक" - प्रतिबंधात्मक स्वदेशी लसीची चाचणी नागपुरात करण्यात येणार आहे. विशेषत: पाच ते 18 वर्षे वयोगटातील मुलांकरिता वॅक्सिंग ट्रायल होणार आहे. पुणे येथील जेनोव्हा बायो फार्मासिटिकल्सने आतापर्यंत मानवी चाचण्यांचा दोन तृतीयांश टप्पा पूर्ण झालेला आहे. ट्रायच्या फेज 1 व फेज 2 चाचण्यांमध्ये चार हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. आता कंपनीला पाच ते अठरा वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या चाचणीला डीसीजीआय तर्फे मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या ट्रायल आता सुरू होणार आहेत.

जेमकोवॅक लसीचे वैशिष्ट्य - लसीत स्पाईक प्रोटीन तयार करण्यासाठी डीएनएचा वापर करण्यात आलेला आहे, ही लस इतर कोविड लसींप्रमाणेच रोगप्रतिकारक शक्ती तयार करते, कोरोनाचे नवनवीन व्हेरीयंट येत आहे त्यावर ही लस प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. ही लस 2 ते 8 डिग्री तापमानात साठवणे शक्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे mRNA लसींची परिणामकारता अधिक प्रभावी आहे.

नवीन व्हेरीयंट सुद्धा ठरणार प्रभावी - mRNA लस इतर लसींच्या तुलनेत अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहेत परदेशात फायजर बायोयेनटेक आणि मॉर्डना या mRNA लसींची निर्मिती करतात. तर जेनोव्हा कंपनी जेमकोवॅक ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. भारतात या लसीची 12 ते 18 वयोगटात 800 व्यक्तींवर ट्रायल करण्यात येणार आहे. लहान मुलांना वायरल संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्याने करणे आवश्यक आहे, याकरिता यासाठी जेमकोवॅक या स्वदेशी लसीची चाचणी सुरू करण्यात अली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.