नागपूर - उपराजधानीत घाटावर जळणारे मृतदेह चिंता वाढवत आहे. कारण परिस्थिती अशी आहे की मृतदेह जाळण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात जवळपास 17 अंत्यविधी घाट व 150 ओटे आहेत. पण कोरोना व इतर मृत्यूमुळे घाटावर ओटे अपुरे पडू लागले आहेत. यामुळे जागा मिळेल तिथे सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची मृतांच्या नातेवाईकांवर वेळ आली आहे.
हेही वाचा-राजावाडीत फक्त एका तासात होते लसीकरण, चांगल्या सुविधांमुळे लाभार्थी खुश
गंगाबाई घाटात सर्वाधिक अंत्यसंस्कार-
नागपूर शहरातील सर्वाधिक अंत्यसंस्कार हे गंगाबाई घाटात होत आहेत. या ठिकाणी 30 ओटे आहेत.कोरोनाने दगावलेल्या 54 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर 12 अशा पद्धतीने शुक्रवारी 66 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे जागा मिळेल तेथे सरणाचे लाकडे ठेवूंन मृतदेहांना अग्नी द्यावा लागत आहे. यातच मागील तीन दिवसांपासून डिझेल दाहिनी बिघडल्याने ताण अधिक वाढला असल्याचेही सांगितले जात आहे.
इतर घाटांवर अशीच काहीशी परिस्थिती -
प्रमुख घाट अंबाझरी घाटावर 11 ओटे आहेत. एलपीजी दाहिनी आहे. त्यामध्ये 4 ते 5 जणाचे अंत्यसंस्कार होत आहे. येथे शुक्रवारी 38 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात 7 नॉन कोविड तर 31 मृतदेह हे कोविडचे होते. मोक्षधाम घाटात 49 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानेवाडा घाटावर 11 ओटे आहेतच. ठिकाणी 27 जण कोरोनामुळे मरण पावलेले मृतदेहांवर तर 13 इतर कारणाने मृत्यू अशा 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात 17 पैकी 4 घाटावर जवळपास 152 मृतदेह हे कोरोना बधितांचे आहेत. अशा पद्धतीने 193 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा-कोव्हिड रुग्णांना नातेवाईकांकडून नारळामधून दारू, टरबुजातून तंबाखू देण्याचा प्रयत्न
कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करणे आवश्यक-
स्मशानात जळणाऱ्या चिता पाहून भीती वाटत असेलही पण हेच वास्तव आहे. घरातील कर्ता माणुस गेला त्यानांच हे दुःख कळू शकेल. अनके लोक कोरोनातून बरे होता आहेत. हेही वास्तव आहेच. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन आणि सुरक्षितपणे घरात राहणे हे आजच्या परिस्थितीत सुशिक्षित होण्याचे लक्षण आहे. हे लक्षणच कोरोनाच्या लक्षणांना नक्कीच दूर ठेवू शकेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.